Chhatrapati Sambhajinagar News : एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी शिरसाट व महायुती सरकारवर तीव्र आरोप करत प्रशासकीय गुंडगिरी, लोकशाहीची हत्या आणि नैतिकतेवर बोलण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले. पक्षातील मतभेद मान्य करत त्यांनी पक्ष एकतेवर भर दिला.
छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत जलील यांनी शिरसाटांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना महायुती सरकारच्या गुंडगिरीवर जोरदार प्रहार केला. इम्तियाज जलील म्हणाले की, उत्तर प्रदेशातील एका घटनेचा उल्लेख करत जलील म्हणाले की जेव्हा एखादा मुख्यमंत्री लहान मुलीचा बुरखा स्वतःच्या हाताने काढतो. तेव्हा ती निंदनीय गोष्ट असते. जर कोणी म्हणत असेल की त्यांचा हात इकडे तिकडे गेला असता तर काय झाले असते? तर अशांचे हात तोडून त्यांच्याच हातात देण्याची ताकद आमच्यात आहे. ती मुलगी कोणत्याही जाती-धर्माची असो आमची भूमिका हीच राहिली असती.
Chhatrapati Sambhajinagar Election : ‘आता युती म्हणजे थेट डोकेफोडी…; संजय शिरसाट यांच्या वक्तव्याने खळबळ
६५ जागा बिनविरोध होणे ही लोकशाहीची हत्या
राज्यात ६५ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याच्या मुद्द्यावर जलील यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर प्रशासकीय गुंडगिरीचा आरोप केला. उमेदवारांना उचलून नेणे त्यांच्यावर दबाव टाकून अर्ज मागे घ्यायला लावणे ही लोकशाहीला घातक ठरणारी गुंडगिरी आहे. निवडणूक आयोग आणि प्रशासकीय यंत्रणेला खिशात टाकण्याचे काम या सरकारने केले आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
Chhatrapati Sambhajinagar : लग्नाला २६ दिवस बाकी, पत्रिका वाटायला गेलेला प्रसाद परतलाच नाही, सर्वांनी फोन लावले पण ज्याची भीती तेच घडलं, लगीनघर दु:खात बुडालं
एमआयएममधील बंडाळी
एमआयएममधील अंतर्गत वादावर बोलताना जलील म्हणाले की, काही लोकांनी बंडखोरी केली असली तरी ते एमआयएमचेच कट्टर समर्थक आहेत. इम्तियाज जलील महत्त्वाचा नाही. पक्ष महत्त्वाचा आहे. जर माझ्यावर कोणाची नाराजी असेल तर त्याचा फटका पक्षाला देऊ नका. औवेसी साहेबांनी मला महाराष्ट्रात काम करायला सांगितले आहे आणि मी त्यासाठी तयार आहे.
