राज्यभरात महापालिका निवडणुकांचा धुराळा उडताना दिसत आहे. अनेक ठिकाणी उमेदवारी मिळाली नाही म्हणून कार्यकर्ते नाराज झाल्याचे बघायला मिळाले. छत्रपती संभाजीनगर, नाशिक इथे तर कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलेला बघायला मिळाला. पण पुण्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्याने चक्क ‘एबी फॉर्म’च खाल्ल्याचं बघायला मिळालं.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग ३६ (अ) साठी पक्षाकडून दोन उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आल्याने पेच निर्माण झाला होता. बुधवारी सकाळी मच्छिंद्र ढवळे आणि उद्धव कांबळे यांच्यात यावरून जोरदार बाचाबाची झाली. ही वादावादी सुरू असतानाच, संतापलेल्या उद्धव कांबळे यांनी मच्छिंद्र ढवळे यांच्या हातातील पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म खेचला आणि तो फाडून थेट तोंडात टाकून गिळून टाकला.
ऐन उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी घडलेल्या या अजब प्रकारामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर प्रचंड तणाव निर्माण झाला. एकाच पक्षाच्या दोन कार्यकर्त्यांमधील हा अंतर्गत कलह पाहून उपस्थित नागरिक आणि इतर पक्षाचे उमेदवारही चक्रावून गेले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणि गोंधळ घातल्याप्रकरणी पोलिसांनी उद्धव कांबळे यांना ताब्यात घेतले आहे.
Municipal Election : मतदानाच्या आधीच गुलाल उधळला, भाजपची विजयी घोडदौड, राज्यभरात 6 नगरसेवकांची बिनविरोध निवड
निवडणुकीच्या तोंडावर ‘एबी फॉर्म’ खाऊन टाकण्याच्या या घटनेमुळे शिवसेनेच्या प्रतिमेला धक्का बसला असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे. उमेदवारी कोणाला मिळणार, यावरून झालेला हा राडा आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. दरम्यान, या घटनेनंतर मच्छिंद्र ढवळे यांना नवीन फॉर्म मिळणार की त्यांचा अर्ज अवैध ठरणार, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टता मिळालेली नाही.
BIG BREAKING : संजय राऊतांच्या घरी बॉम्ब शोधक पथक आणि मुंबई पोलीस दाखल
दरम्यान, पुण्यात नुकतीच आणखी एक शिवसेना पदाधिकाऱ्याची अशाच प्रकारची बातमी समोर आली होती. शिवसेनेच्या एका महिला इच्छुक उमेदवाराने आपल्याला पक्षाने अधिकृत उमेदवारी दिल्याचा दावा केला. पक्षाने आपल्याला एबी फॉर्म दिला होता. पण आपला एबी फॉर्म दुसऱ्याने पळवून नेला, असा आरोप महिलेने केले होता. पुणे महापालिकेच्या प्रभाग 3 मधून इच्छुक उमेदवार पद्मा शेळके यांनी संबंधित आरोप केला होता.
