पुण्यात भाजप आणि शिवसेनेच्या गोटाच प्रचंड हालचाली सुरु आहेत. विशेष म्हणजे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत भाजप आणि शिवसेनेची युती होणार का? याबाबत सस्पेन्स राहीला. अखेर ही युती तुटली आहे. पण ही युती नेमकी का फिस्कटली? याची इनसाईड स्टोरी आता समोर आली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 28 डिसेंबर रोजी शिवसेनेकडून 15 उमेदवारांची यादी देण्यात आली होती. पर्यायाने हीच यादी भाजपला पाठवण्यात आली होती. या यादीवर भाजप-सेनेच्या युतीचे भवितव्य अवलंबून होते. कारण भाजप सेनेला 15 जागा देण्यास तयार होते आणि 35 जागा मागणारी शिवसेना सुद्धा 28 तारखेपर्यंत 15 जागेवर तयार झाली होती. त्यानुसार शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे, विजय शिवतारे, रविंद्र धंगेकर, अजय भोसले, उल्हास तुपे, आबा बागुल यांनी एक 15 उमेदवारांची तयार केली. पण याच यादी मुळे भाजप-शिवसेनेत वाद विकोपाला गेला.
Pune Municipal Election : चंद्रकांत दादांना विधानसभेत नडणाऱ्या माजी नगरसेवकाचं भाजपने तिकीट कापलं, पण अमोल बालवडकरांनी गेम फिरवला
या यादीमध्ये प्रभाग क्रमांक 41 ब मधून प्रमोद नाना भानगिरे, 41 क स्वाती अनंत टकले, 24 ड प्रणव रवींद्र धंगेकर, 23 क प्रतिभा रवींद्र धंगेकर, 26 ड उल्हास उर्फ वसंतराव बागुल, 37 क गिरीराज तानाजी सावंत, 37 ड रूपाली रमेश कोंडे, 38 क वनिता जालिंदर जांभळे, 38 इ स्वराज नमेश बाबर, 39 क मनिषा गणेश मोहिते, 6 ड आनंद रामनिवास गोयल, 3 क गायत्री हर्षवर्धन पवार, 16 ड उल्हास दत्तात्रय तुपे, 40 ड दशरथ पंढरीनाथ, काळभोर किंवा गंगाधर विठ्ठल बधे, 11 क वैशाली राजेंद्र मराठे यांचे नावं होती.
Municipal Election : महाराष्ट्रात तब्बल 15 महापालिकांमध्ये भाजप-शिवसेनेची युती तुटली, कुठे-काय घडलं? वाचा A टू Z
पण या सगळ्या नावामधून प्रभाग क्रमांक 24 ड हे मूळ वादाचे कारण ठरले. कारण या जागेवरून भाजपचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर हे रिंगणात आहेत. आणि त्याच जागेवर रवींद्र धंगेकर यांचे पुत्र प्रणव धंगेकर यांना उमेदवारी हवी होती. मात्र या जागेवर भारतीय जनता पक्ष कोणतेही कॉम्प्रमाईज करायला तयार नव्हते. खरी वादाची ठिणगी इथेच पडली आणि सेना भाजपची युती ही फुटीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली. आता शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी जरी युती तुटली नसल्याचं म्हटलं असलं तरी ना शिवसेना कॉम्प्रमाईजच्या मूडमध्ये आहे ना भारतीय जनता पक्ष. त्यामुळे तीन तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशीपर्यंत चर्चेचे गुऱ्हाळ हे सुरूच राहणार असून कार्यकर्ते मात्र गॅसवरच राहणार आहेत हे नक्की!
