उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. आमदार सना मलिक यांनी माध्यमांसमोर येत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.
“आमच्या विद्यमान नगरसेवक होते तिथे आम्ही प्राधान्य दिलं आहे. त्यानंतर आम्ही नव्या पिढीला जास्तीत जास्त संधी दिली आहे. अनेक कुमारी मुली आहेत, ज्या पहिल्यांदा निवडणूक लढणार आहेत. जसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं युवाबाबत धोरण आहे, तरुण पिढीला जास्त संधी दिली जाते. तसंच युवकांना आम्ही जास्त संधी दिली आहे. आमच्या पक्षाच्या सर्व धर्माच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही सर्वांना समान संधी दिली आहे. ही यादी आम्ही आता जाहीर केली आहे”, अशी माहिती आमदार सना मलिक यांनी दिली.
वॉर्डनिहाय उमेदवारांची यादी
मुंबईत वार्ड क्र. 3 मधून मनीष दुबे, ४८ मधून सिरील पिटर डिसोझा, ६२ मधून अहमद खान, ७६ मधून बबन रामचंद्र मदने, ८६ मधून सुभाष जनार्दन पाताडे, ९३ मधून डॉ. सचिन तांबे, ९६ मधून आयेशा शाम्स खान, १०९ मधून सज्जू मलिक, ११३ मधून शोभा रत्नाकर जाधव, १२५ मधून हरिश्चंद्र बाबालिंग जंगम, १३५ मधून अक्षय मोहन पवार, १४० मधून ज्योती देविदास सदावर्त, १४३ मधून रचना रवींद्र गवस, १४६ मधून भाग्यश्री राजेश केदारे, १४८ मधून सोमू चंदू पवार, १६५ मधून अब्दुल रशीद (कप्तान) मलिक, १६९ मधून चंदन धोंडीराम पाटेकर, १७१ मधून दिशा अमित मोरे तर २२४ मधून सबिया अस्लम मर्चेंट यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
यासोबतच वार्ड क्र. ४० मधून विलास दगडू घुले, ५७ मधून अजय दत्ताराम विचारे, ६४ मधून हदिया फैजल कुरेशी, ७७ मधून ममता धर्मेंद्र ठाकूर, ९२ मधून युसुफ अबुबकर मेमन, ९५ मधून अमित अंकुश पाटील, १११ मधून धनंजय (दादा) पिसाळ, १२६ मधून प्रतीक्षा राजू घुगे, १३९ मधून नागरत्न संदीप बनकर, १४२ मधून चांदणी अजय श्रीवास्तव, १४४ मधून दिलीप हरिश्चंद्र पाटील, १४७ मधून अंकिता संदीप द्रवे, १५२ मधून लक्ष्मण श्रीरंग गायकवाड, १६८ मधून डॉ. सईदा खान, १७० मधून बुशरा परवीन मलिक, १७५ मधून वासंधी मुरुगेश देवेंद्र, २२२ मधून किरण रविंद्र शिंदे, १९७ मधून फरीन इम्तियाझ खान यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
“आम्ही महाविकास आघाडीसोबत असताना किंवा आता महायुतीसोबत असताना आम्ही कधीही विचारधारेसोबत तडजोड केलेली नाही. कुणाला कुठे संधी नाही मिळाली त्यामुळे ते आमच्या मूळ पक्षातपरत आले. जसे ते सिटिंग नगरसेवक होते त्यामुळे आम्ही त्यांना प्रायोरिटी दिली आहे”, अशी प्रतिक्रिया सना मलिक यांनी दिली.
