Pune Couple Divorce : मोठ्या अपेक्षेने दोघांनी १८ महिन्यांपूर्वी प्रेम विवाह केला, मात्र लग्नानंतर अवघ्या २४ तासांत पतीच्या कामाच्या स्वरुपावरुन नवरा-बायको दोघांमध्ये खटके उडू लागले
काय आहे प्रकरण?
घटस्फोट झालेले हे दाम्पत्य समाजातील प्रतिष्ठित वर्गातील आहे. पती एका जहाजावर (शिप) मोठ्या पदावर कार्यरत आहे, तर पत्नी व्यवसायाने डॉक्टर आहे. मोठ्या अपेक्षेने या दोघांनी १८ महिन्यांपूर्वी प्रेम विवाह केला होता. मात्र लग्नानंतर अवघ्या २४ तासांत पतीच्या कामाच्या स्वरुपावरुन नवरा-बायको दोघांमध्ये खटके उडू लागले. वादाची ठिणगी इतकी मोठी होती की, लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच त्यांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला.
Nagpur Crime : बॅचलर्स पार्टीत तरुणाचा मृत्यू, 11 मित्रांवर गुन्हा, नागपुरातील फार्म हाऊसवर काय घडलं? आदित्यला रात्रभर…
घटस्फोटावर शिक्कामोर्तब
३ डिसेंबर रोजी या जोडीने वकील अॅड. राणी कांबळे-सोनावणे यांच्यामार्फत परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. सामान्यतः घटस्फोटासाठी सहा महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी अनिवार्य असतो, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांनुसार, जर पती-पत्नी १८ महिन्यांपेक्षा जास्त काळ विभक्त राहत असतील, तर हा कालावधी शिथिल केला जाऊ शकतो. हे दाम्पत्य दीड वर्षांपासून वेगळे राहत असल्यामुळे आणि पतीला तातडीने नोकरीसाठी परदेशी जाणे आवश्यक असल्याने न्यायालयाने १० डिसेंबर रोजी घटस्फोटावर शिक्कामोर्तब केले.
Nagpur Crime : ख्रिसमस पार्टीनंतर भयंकर घडलं, क्लबबाहेरच 28 वर्षांच्या प्रणयने जीव गमावला, नागपुरात खळबळ
वैचारिक मतभेद टोकाला
विभक्त राहण्याच्या काळात दोघांच्याही कुटुंबीयांनी त्यांचे मन वळवण्याचा आणि संसार पुन्हा सावरण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, वैचारिक मतभेद टोकाला गेल्यामुळे त्यांनी पुन्हा एकत्र येण्यास नकार दिला. अखेर कायदेशीररीत्या नाते संपवणे हाच एकमेव पर्याय असल्याचे मान्य करत त्यांनी हा निर्णय घेतला. वाढत्या घटस्फोटांच्या पार्श्वभूमीवर अगदी क्षुल्लक कारणांवरून सुखी संसाराला लागलेली ही गळती सध्या चिंतेचा विषय ठरत आहे.
पिवळं वादळ मुंबईत धडकणार! धनगर समाजाला साद, विजयसिंह पंडितांसमोर दीपक बोऱ्हाडेंचं आवाहन
