Nanded Four Members One Family Died : या प्रकरणाचा तपास नांदेड ग्रामीण पोलीस करत असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
नेमकी घटना काय?
मुदखेडतालुक्यातील जवळा गावात राहणाऱ्या लखे कुटुंबातील ही हृदयद्रावक घटना आहे. प्राथमिक माहितीनुसार, या कुटुंबातील दोन मुलांनी धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. ही बातमी समोर येत असतानाच, घरी त्यांचे आई-वडील देखील मृतावस्थेत आढळल्याने गावकरी आणि पोलीस प्रशासन चक्रावून गेले आहे. आई-वडिलांचे मृतदेह घरामध्ये पलंगावर पडलेल्या अवस्थेत मिळून आले आहेत.
सक्षम ताटे हत्या प्रकरण: जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच सक्षमची प्रेयसी आचल आणि आईचा आत्मदहनाचा प्रयत्न; नेमकं कारण काय?
आत्महत्या की घातपात? पोलिसांकडून तपास सुरू
एकाच कुटुंबातील चार जणांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात विविध चर्चांना उधाण आलं आहे. मुलांनी आत्महत्या केली असली तरी, आई-वडिलांनी देखील आत्महत्या केली की त्यांचा घातपात झाला आहे, याचा तपास आता पोलीस करत आहेत. एकाच कुटुंबातील चार जणांचा अशाप्रकारे अंत झाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करत आहेत. चारही जणांच्या मृत्यूच्या कारणाचा पोलीस शोध घेत आहेत.
Ratnagiri Crime : आई…; पोटचं लेकरु मध्यरात्री लघवीसाठी उठलं, आई दिसेना म्हणून आजीला उठवलं; बाहेर पाहिलं तर…
दरम्यान, आधी मुलांनी आपल्या आई-वडिलांचा जीव घेतला आणि त्यानंतर दोघांनी स्वत:चा जीव दिला, असा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे जवळा गावात शोककळा पसरली असून, एकाच कुटुंबाचा असा अंत झाल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस तपासानंतरच या प्रकरणातील सत्य स्पष्ट होणार आहे.
