Miraj Former Sarpanch Son Commits Suicide : सांगलीतील मिरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. टाकळी येथील माजी महिला सरपंचच्या मुलाने आपलं आयुष्य संपवलं आहे.
साताऱ्यातील डोळे पाणावणारी घटना
दरम्यान, संकटात धावून येत एकमेकांना मदत करणे आणि सहानुभूती दाखविणे, यालाच माणुसकी म्हणतात. अशाच माणुसकीचा प्रत्यय साताऱ्यातील एका घटनेने आला. उत्तर प्रदेशातून कामाच्या शोधात आलेल्या विकास भारद्वाज नामक तरूणाने वैयक्तिक कारणातून आत्महत्या केली. त्या हिंदू तरूणावर साताऱ्यातील ‘खिदमत-ए-खलक’ या सामाजिक संस्थेने जाती, धर्म आणि प्रांताच्या पलीकडे जात हिंदू रितीरिवाजानुसार विधीवत अंत्यसंस्कार करून माणुसकीचे नाते जपले.
Pune Crime : वडील कामानिमित्त पुण्यात, आई कंपनीत गेलेली, घरात एकट्या असलेल्या चिमुकलीला अत्याचार करुन संपवलं; मावळ हादरलं
नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशातील विकास भारद्वाज नामक तरूण कामाच्या शोधात साताऱ्यात आला होता. मात्र, त्याने 12 डिसेंबर रोजी आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी नातेवाईक साताऱ्यात पोहोचले. मात्र, दु:खद घटना आणि आर्थिक अडचणींमुळे हिंदू धर्मातील रितीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यास ते असमर्थ होते. अशा परिस्थितीत नातेवाईकांनी सातारा पोलिसांकडे मदतीची विनंती केली. सातारा पोलिसांनी खिदमत-ए-खलक या सामाजिक संस्थेशी संपर्क साधला.
Kolhapur Crime: माझी बॉडी पाण्याबाहेर यायला वेळ लागेल; कोल्हापुरात प्रसिद्ध डॉक्टरने मृत्यूला कवटाळले, शेवटचा धक्कादायक मेसेज समोर
खिदमत-ए-खलक संस्थेचे अध्यक्ष सादिक शेख यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अब्दुल सुतार, आरिफ खान, हाफिज मुराद आसिफ खान, शाहरुख शेख, मुस्तफा बागवान आणि इतर स्वयंसेवकांना बोलावून घेतले. त्यांच्या मदतीने संगम माहुली घाटावरील कैलास स्मशानभूमीत विकास भारद्वाज या तरूणावर हिंदू धर्माच्या विधीप्रमाणे अंत्यसंस्कार केले. मृत विकास भारद्वाजचे बंधू विनोद भारद्वाज आणि नातेवाईकांनी साश्रूपर्ण नयनांनी लाडक्या विकासला अखेरचा निरोप दिला.
