बीड पोलिसांनी दुचाकी चोरीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. कृष्णा अंतरकर नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून….
नागरिकांचे दुहेरी नुकसान
आरोपीच्या या फायनान्सच्या ओळखीवर विश्वास ठेवून अनेक नागरिकांनी ह्या गाड्या विकत घेतल्या. मात्र, बीड पोलिसांनी तपास केल्यावर त्या सर्व गाड्या चोरीच्या असल्याचे निष्पन्न झाले आणि त्या जप्त करण्यात आल्या. यामुळे संबंधित खरेदीदारांचे दुचाकी गमवण्यासोबतच दिलेले पैसेही गमवावे लागले, अशाप्रकारे नागरिकांचे दुहेरी आर्थिक नुकसान झाले आहे.
Brown University shooting: परीक्षेच्या दिवशी कॅम्पसमध्ये गोळीबाराचा थरार, 2 जण ठार, हल्लेखार…
आरोपी अटक, आठ दुचाकी जप्त
मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी बीड शहर पोलीस ठाण्याच्या अँड पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास केला. याच प्रयत्नातून आरोपी कृष्णा अंतरकर याला अटक करण्यात आली आणि त्याच्याकडून विविध ठिकाणांहून चोरीस गेलेल्या आठ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या.
दुचाकी चोरीचे 24 गुन्हे उघड
या कारवाईमुळे शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि बीड शहर पोलीस ठाणे हद्दीतील २४ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस झाले आहेत.तरी या प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपीचा आणखी गुन्ह्यांमध्ये सहभाग सिद्ध होण्याची शक्यता आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा पवार यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्या नेतृत्वाखालील पोलीस उपनिरीक्षक महेश जाधव, पोलीस अंमलदार गहिनीनाथ बावनकर, राम पवार, शेख, मंगेश शिंदे आणि शौकत शेख तसेच बीड शहर पोलीस ठाण्याच्या डिटेक्शन पथकातील इतर अधिकारी व अंमलदारांनी योगदान दिले.
