केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नागपुरात जावून वेगळ्या विदर्भाची मागणी केली आहे. तसेच वेगळ्या विदर्भाची मागणी आपल्या पक्षाने सर्वात आधी केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
“वेगळ्या विदर्भाच्या मागणीच्या आंदोलनाची तिव्रता दिसत नाही. ज्याप्रमाणे तेलंगणा आणि आंध्रामध्ये जे झालं, तेलंगणा वेगळं करण्यासाठी चंद्रशेखर राव यांनी मोठं आंदोलन केलं होतं. तसं आंदोलन विदर्भात दिसत नाही. आमची वेगळा विदर्भाची मागणी आहेच. माझ्या पक्षाची स्वतंत्र विदर्भाची मागणी आहे”, अशी भूमिका रामदास आठवले यांनी मांडली.
आठवलेंचा ठाकरे बंधूंवर काव्यात्मक हल्ला
“मी आज विधीमंडळाचा मारलाय फेरफटका, कारण मला द्यायचा आहे ठाकरेबंधूंना झटका”, असा काव्यात्मक हल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर शनिवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना चढविला. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे त्यांच्या विनोदी कवितांसाठी प्रसिद्ध आहेत. संसदेचे अधिवेशन असो वा सार्वजनिक कार्यक्रम असो. आठवले कायम त्यांच्या विनोदी शैलीतील काव्याने टीकाटिप्पणी करत असतात. अशात शनिवारी त्यांनी विधीमंडळाला भेट दिली. यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला.
एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, सिडकोच्या घरांच्या किंमती कमी केल्या, अनेकांचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार
आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका, महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय तसेच नागपूरातील हिवाळी अधिवेशनाचे महत्त्व आदी मुद्यांवर त्यांनी भाष्य केले. “नागपूर ही आपली उपराजधानी आहे. येथे होणारे अधिवेशन नागपूर आणि विदर्भाच्या विकासावर चर्चा करण्यासाठी असते”, असं रामदास आठवले म्हणाले. यावेळी त्यांनी महायुतीवरही भाष्य केलं.
आठवलेंचा महायुतीत महापालिका निवडणुका लढण्याचा निर्धार
“माझा रिपब्लिकन पक्ष हा महायुतीमध्ये आहे. आम्ही येत्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये आम्ही एकमेकांविरुद्ध लढलो, तो आमचा गनिमी कावा होता. मात्र, महानगपालिकेच्या निवडणुकांमध्ये आम्ही एकत्र लढणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात चर्चा झाली आहे. त्यानुसार, रिपब्लिकन पक्षाला सोबत घेऊन १९ महानगरपालिकांच्या निवडणुका आम्ही सोबत लढणार असून त्यामध्ये आम्हाला आमचा योग्य वाटा मिळायला हवा”, अशी भूमिका रामदास आठवले यांनी मांडली.
Nagpur : नागपुरात शिक्षण समितीचं आंदोलन, महिलेची प्रकृती बिघडली, विधान भवनाबाहेर प्रचंड आक्रोश
“रिपब्लिकन पक्षाची ताकद अनेक शहरांमध्ये आहे. त्यादृष्टीने मी बोलणार आहे. आम्हाला मुंबईमध्ये १५ ते १६ आणि नागपूरात ७ ते ८ जागा मिळाव्यात, अशी मागणी आहे”, असं रामदास आठवले म्हणाले. राज्य विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेतेपद रिक्त असल्याच्या मुद्यावरही त्यांनी भााष्य केलं. “विरोधी पक्षनेता हा संख्याबळाच्या आधारावर ठरत असतो. सध्या महाविकास आघाडीकडे ते संख्याबळ नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय अध्यक्षांनी नियमानुरूप घ्यायला हवा. मात्र, सभागृहात विरोधी पक्षनेता असायलाच हवा”, असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं.
‘म्हणून आम्ही त्यांच्यावर केलाय हल्ला’
आठवले यांनी यावेळी विरोधकांवरही काव्यात्मक हल्ला चढविला. “विरोधकांनी वेगळ्याच ठिकाणी मारलाय डल्ला, म्हणून आम्ही त्यांच्यावर केलाय हल्ला”, असे ते विरोधकांवर बोलताना म्हणाले.
