Nagpur News: विधानपरिषदेत छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या यूट्यूबवरील नाटकांवर कारवाईची मागणी आमदार अमोल मिटकरींनी केली. त्यानंतर पंकज भोयर यांनी हे नाटक हटवण्याचं आश्वासन दिलं. तर सीबीएससी अभ्यासक्रमात शिवाजी महाराजांचा इतिहास कमी शब्दांत असल्याच्या मुद्द्यावरही यावेळी चर्चा झाली.
दुसरीकडे, सीबीएससीच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त 68 शब्दांत असल्याचा मुद्दा सत्यजित तांबे यांनी अधिवेशनातील अर्धा तासातील चर्चेदरम्यान उपस्थित केला. शिवाजी महाराजांबाबत शिक्षण विभाग अतिशय उदासीन असल्याची टीका त्यांनी केली. कमी शब्दाचा इतिहास हा महाराजांचा अवमान असल्याचे किशोर दराडे म्हणाले. तर युट्युबरून संभाजी महाराजांची बदनामीकारक नाटक, मजकूर हटविण्याची मागणी केली. यावर पंजक भोयर म्हणाले की, अभ्यासक्रमात द राईज ऑफ मराठाच्या माध्यमातून 2200 शब्दांचा इतिहास नमूद आहे. परंतु ही माहिती कमी असेल तर ती अधिक वाढविण्यासाठी एनसीआरटीकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे ते म्हणाले. युट्युबवरून संभाजी महाराजांचे बदनामीकारक नाटक, मजकूर हटविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
छत्रपती शिवाजी महाराज अस्सल चरित्र साधन खंड निर्मिती
छत्रपती शिवाजी महाराज अस्सल चरीत्र साधन खंड निर्मिती करण्याची मागणी अमोल मिटकरी यांनी केली. यावर खंड निर्मिती करणार असल्याचे आश्वासन भोयर यांनी दिले. त्याच प्रमाणे शाळांमध्ये शिवचरित्रांचे वाचन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
