Sawantwadi Dominic Dsouza Died Goa Club : गोव्यात आग लागलेल्या नाईट क्लबमध्ये अनेक जणांचा मृत्यू झाला. यात सिंधुदुर्गमधील सांवतवाडी येथील एका 40 वर्षीय व्यक्तीचा देखील समावेश होता.
क्लबमध्ये वेटर म्हणून कार्यरत
डॉम्निक डिसोजा हे कामानिमित्त गोव्यात स्थायिक झाले होते आणि ते ज्या क्लबमध्ये ही दुर्घटना घडली, त्याच क्लबमध्ये वेटर म्हणून कार्यरत होते. क्लबला आग लागल्यानंतर किचनमध्ये गुदमरल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. डॉम्निक डिसोजा यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि एक मुलगा असे कुटुंबीय आहे.
Nanded News : खुर्चीवरुन धड उठता येईना, वर्गात पाणी ओतलं, विद्यार्थी घाबरले; शाळेतल्या पोरांसमोर मुख्याध्यापकाचा दारु ढोसून कारनामा; VIDEO
भावाला बातमी कळताच…
काही वर्षांपूर्वी रेडी कनयाळ गावामध्ये स्थायिक झालेले डॉम्निक यांचे भाऊ सावंतवाडीमध्ये राहत असून त्यांना ही बातमी मिळाल्यावर ते तातडीने गोव्याकडे रवाना झाले. शांत व मनमिळाऊ स्वभावामुळे डॉम्निक यांचे देवसू गावातील प्रत्येकाकडे सलोख्याचे आणि जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी कळाली आणि अवघा गाव शोक सागरात बुडाला. डॉम्निक डिसोजा यांच्या पार्थिवावर सोमवारी दि. 8 डिसेंबर रोजी दुपारी कनयाळ येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
गोव्यातील या दुर्घटनेनंतर या सगळ्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सखोल चौकशीच्या आदेश दिले आहेत. गोव्यातील या दुर्घटनेनंतर गोवा राज्याला लागूनच असलेल्या असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पर्यटन व्यवसायिकांना योग्य त्या उपाययोजना करून काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनही सावध झाले आहे.
Pune News : संस्थेची गाडी कार्यालयासमोर लागली, सहकाऱ्यांच्या हातात उमेदवारी अर्ज, तानाजी सावंत यांच्या मुलाला हवी भाजपची उमेदवारी?
बेली डान्सर गोत्यात
रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपींनी देश सोडला आहे. सौरभ आणि गौरव लुथ्रा यांच्या क्लबला शनिवारी रात्री उशिरा आग लागली. या आगीत 25 जणांचा मृत्यू झाला. आग लागल्यानंतर पुढच्या काही तासांत या दोघांनी देश सोडला. ते थायलंडमधील फुकेतला गेले. त्यांचा ठावठिकाणा अद्याप तरी तपास यंत्रणांना सापडलेला नाही. एक महिला डान्सर अदाकारी सादर करत असताना क्लबला आग लागली.
