Nashik Man Ends Life: नाशिक मनपा कर्मचारी विलास सावळीराम गावले यांनी सातपूर फायर स्टेशनमध्ये गळफास घेत आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. गावले यांनी लिहिलेली अखेरची चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे. वैयक्तिक कारणातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर येत आहे.
जीव देण्यामागील कारण अद्याप अस्पष्ट
याप्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, विलास गावले यांनी जीव देण्याचं खरं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या घटनेची माहिती मिळताच त्यांचे मित्र परिवार आणि नातेवाईक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. संबंधित विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून गावले यांच्या जीव देण्याप्रकरणी कुठलेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. सातपूर पोलिस ठाणे अंतर्गत अधिक तपास सुरू आहे.
त्यांच्या जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर
विलास गावले त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी, आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे. अत्यंत मनमिळावू आणि कोणाच्याही दुःखात अडचणीमध्ये धावून जाणारे असा त्यांचा स्वभाव असल्याचं मित्र परिवार यांच्याकडून सांगण्यात येत आहे.
Crime News: लग्नासाठी 25 लाख द्या, नाहीतर बायकोला VIDEO पाठवेन; मीनाक्षी करत होती पोलिस इन्स्पेक्टर ब्लॅकमेल
जीव दिलेल्या मनपा कर्मचाऱ्यांच्या खिशात सापडली सुसाईड नोट
“मी स्वतःहून हे कृत्य करत आहे, यात कोणाचाही दोष नाही मला माफ करा” अशी सुसाइड नोट लिहून मयत मनपा कर्मचारी विलास गावले यांनी लिहून ठेवली होती. आता नेमकं जीव देण्यामागील त्यांचं खरं कारण काय याबाबत सातपूर पोलिस अधिक तपास करत आहे. मात्र, या घटनेने त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. तसेच, परिसरातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं याचा तपास पोलिस करत आहेत.
