Pune Leopard Attack : पुण्यात पुन्हा बिबट्याने हल्ला केला आहे. नारायणगाव – जुन्नरमध्ये ही घटना घडली आहे. एका तरुणावर फोनवर बोलताना बिबट्याने हल्ला केला आहे. सध्या या तरुणाची प्रकृती स्थिर आहे.
बिबट्यांच्या हल्ल्यांची संख्या वाढली
गेल्या काही दिवसामध्ये जुन्नर तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यांची संख्या वाढली असून शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पूर्वीच्या ओतूर, शेटेवाडी व शिवनेरीसारख्या घटनांमुळे वन्यजीव-मानव संघर्ष तीव्र झाला. रात्री मुक्तसंचार टाळा व बिबट्या आढळल्यास वनविभागाशी संपर्क साधा, असं आवाहन करण्यात येत आहे.
Nashik Crime : ‘माझ्या बायकोला तुझ्या शेतात कामाला का नेतो?’, जाब विचारत पतीने मालकाची कार फोडली; संतापात शेतमालकाने…
नेमकी घटना काय घडली?
नारायणगाव-जुन्नर रस्त्यालगत साकार नगरी सोसायटीजवळ रात्री ही थरारक घडली. तनिष नवनाथ हा तरुण अंधारात फोनवर बोलत उभा होता. घटना घडली तेव्हा रात्रीचे सव्वा आठ वाजले होते. हा तरुण फोनवर बोलण्यात गुंग असतानाच बिबट्याने त्याच्यावर हल्ला चढवला. बिबट्याचे नखं त्याच्या पोटरीवर ओरबाडले गेले. नखांचे मोठे ओरखडे त्याला यावेळी लागले आहेत. बिबट्याच्या या हल्ल्यात तो जखमी झाला. नशीब चांगलं होतं, म्हणून त्याला जीवदान मिळालं आहे. तनिषला तातडीने नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याची तब्येत आता स्थिर आहे.
Saksham Tate Murder : सक्षम ताटेला मारण्याआधी त्याच्या घराची रेकी, हत्येच्या दिवशीचं CCTV समोर; ‘त्या’ गल्लीत काय घडलं?
पुणेकरांनो काळजी घ्या!
दिल्लीतील हवेच्या प्रदूषणाची देशभर चर्चा सुरू असताना, पुण्यातील चार भागांमध्ये गुरुवारी हवेची गुणवत्ता श्रेणी अतिवाईटवर पोहोचली. शिवाजीनगर, भूमकरनगर, विमाननगर, लोहगाव भागात संध्याकाळनंतर रस्त्यावरून फिरताना सभोवताली धुके (फॉग) नव्हे, तर धुरके (स्मॉग) बघायला मिळाले. पुण्यात सरासरी हवेची गुणवत्ता सलग तिसऱ्या दिवशी वाईट श्रेणीमध्ये नोंदविण्यात आली.
