• Mon. Mar 9th, 2026

    ‘ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो २०२६’ मराठवाड्याच्या औद्योगिक विकासासाठी उपयुक्त – निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Dec 4, 2025
    ‘ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो २०२६’ मराठवाड्याच्या औद्योगिक विकासासाठी उपयुक्त – निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड – महासंवाद




    नवी दिल्ली, दि. 4 : मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चरतर्फे 8 ते 11 जानेवारी 2026 दरम्यान औरिक सिटी, डीएमआयसी, शेंद्रा येथे होणाऱ्या ‘ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो 2026’ चे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड यांची असोसिएशनचे उपाध्यक्ष राहुल  मोगले यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

    व्हेअर पोटेन्शियल मीट्स ऑपर्च्युनिटीज (Where Potential Meets Opportunities) या संकल्पनेसह आयोजित प्रदर्शन मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी, उत्पादन, तंत्रज्ञान, स्टार्टअप, लॉजिस्टिक्स आणि इतर उदयोन्मुख क्षेत्रांसाठी सर्वात मोठे व्यासपीठ ठरणार आहे. महाराष्ट्र शासन, एमएसएमई विभाग, मिडक आणि औरिक यांच्या पाठबळाने होणाऱ्या या चार दिवसीय मेगा इव्हेंटमध्ये देश-विदेशातील हजारो उद्योजक, गुंतवणूकदार आणि तंत्रज्ञ सहभागी होणार आहेत.

    निवासी आयुक्त (गुंतवणूक)  सुशील गायकवाड यांनी प्रदर्शनाच्या नियोजनाची माहिती घेऊन मार्गदर्शन केले. विविध केंद्रीय मंत्रालये, प्रमुख उद्योगसमूह गुंतवणूकदार आणि संबंधित विभागांशी समन्वय साधून अधिकाधिक सहभाग मिळवून देण्याबाबत त्यांनी सकारात्मक चर्चा केली. तसेच  सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

    मराठवाडा हा औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातील प्रचंड क्षमता असलेला प्रदेश आहे. ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो 2026 या प्रदर्शनामुळे छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाडा क्षेत्राला नव्या गुंतवणुका, रोजगार संधी आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या संधी उपलब्ध होणार असून, मराठवाड्याच्या औद्योगिक क्रांतीला निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास श्री.गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केला.

     

    00000







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed