गौरी पालवे मृत्यू प्रकरणी आता महत्त्वाची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी वरळी पोलिसांकडून तपास सुरु आहे. पोलिसांनी आतापर्यंत सखोल तपास केला आहे. यामध्ये महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
अनंत गर्जे याच्या शरीरावरील जखमांबाबतदेखील महत्त्वाची माहिती समोर आली आहे. गौरीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर अनंतने भिंतीवर डोकं आपटण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्याला डोक्याला दुखापत झाल्याचं समोर आलं आहे. पोलिसांना याबाबत सीसीटीव्ही फुटेज मिळालं आहे. तसेच अनंतने खिडकीतून घरात प्रवेश केला होता. त्यामुळे घराच्या खिडकीला ज्या व्यक्तीने जाळ्या बसवल्या त्यालाच जाळीमधून आतमध्ये प्रवेश करता येतो का? याचं प्रात्याक्षिक दाखवायला सांगण्यात आलं होतं.
अनंतच्या शरीरावर जखमा
अनंतच्या शरीरावर 28 जखमा आहेत. या जखमा ताज्या स्वरुपाच्या आहेत. तसेच गौरी पालवे आणि अनंत यांच्यात झटापटी झाल्याच्या जखमा असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलिसांकडून कोर्टात याबाबत माहिती देण्यात आली. अनंतची पॉलिग्राफ टेस्ट केली जाणार आहे. तसेच मानसशास्त्रीय तपास केला जाणार आहे. तसेच तज्ज्ञांच्या माध्यातून तपास केला जाणार आहे. याशिवाय आवश्यक असेल तेव्हा अनंतची पोलीस कोठडी घेण्याचे अधिकार अबाधित राहावेत, अशी पोलिसांची भूमिका असल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे.
मुक्ताईनगरच्या मतदान केंद्रावर अभूतपूर्व राडा, शिवसेनेच्या कार्यकर्त्याकडून भाजप कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचा आरोप
पोलिसांनी जुन्या प्रेयसीचा जाब नोंदवला
गौरी पालवे आत्महत्या प्रकरणी आणखी महत्त्वाची माहिती समोर येत आहे. वरळी पोलिसांनी अनंत गर्जे याच्या जुन्या प्रेयसीचा जबाब नोंदवला आहे. अनंतसोबत 2022 पासून कोणताही संबंध नव्हता. गौरीच्या घरी सापडलेल्या कागदपत्रांबाबत कल्पना नाही, असा जबाब महिलेने पोलीस चौकशीत दिला आहे.
सर्वात मोठी बातमी, आदित्य ठाकरे यांनी थेट नावे सांगितली, मतदारयाद्यांबाबत काय-काय म्हणाले?
दरम्यान, अनंत गर्जे याला या प्रकरणी आतापर्यंत कोर्टात तीनवेळा हजर करण्यात आलं आहे. एफआयआरमध्ये अनंतच्या जुन्या प्रेयसीचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे तिचा सुद्धा जबाब नोंदवण्यात आला आहे. यामध्ये आपला 2022 पासून अनंतसोबत कोणताही संबंध नव्हता, असा जबाब संबंधित महिलेने दिला. तसेच अनंतच्या घरात सापडलेल्या कागदपत्रांबाबतही आपल्याला कल्पना नसल्याचं महिलेने म्हटलं आहे.
