Uddhav Thackeray on Local Body Election Results : निवडणुकांसाठी मतदान झाल्यानंतर सर्व नगरपरिषद-नगरपंचायतींचे निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार असून उद्धव ठाकरे यांची मोजक्या शब्दात पहिली प्रतिक्रिया आली आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
गेल्या काही महिन्यांपासून मातोश्रीवर रोजच पक्षप्रवेश सुरु आहेत. हवेत जसे प्रदूषण आहे तसे राजकारणात आहे. काँग्रेस बरोबर गेले म्हणून आम्ही युती तोडली. किंवा उद्धव ठाकरे यांच्या नावाची चर्चा करून धूळफेक करण्याचे काम करण्यात आले. धुळफेक केलेली असल्यामुळे कट्टर शिवसैनिक परत येतात. भाजप शिवसेनेवर अन्याय करतंय, म्हणून मी मंत्रिमंडळात त्यांच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही, असं सांगत कल्याण डोंबिवलीच्या सभेत राजीनामा देतोय, सांगितल्याचं पाहिलंय, मग कधी अजित पवार निधी देत नाही, अशी अनेक कारणे ठाण्याची लोकं देतात. मला शिव्या घालत होते, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आज त्यांच्या पोस्टरवर दिघे साहेबांच्या शेजारी सोनिया गांधी यांचा फोटो आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.शिवसेनेचे वट आजही ठाण्यात आहे. ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तो अबाधित राखण्याचे काम तुम्हाला करायचं आहे. मशाल वेगळी ठेवा, भगव्यावर कोणतंही चित्र छापू नका, तो शिवरायांचा आहे, तो पवित्र आहे, तो तसाच फडकला पाहिजे, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं. मशाल घेऊन पुढे चला, मशालीच्या तेजाने सर्व जळमटं जळून खाक होतील. इतरांनी जे केलं, ते तुम्ही करू नका, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या असताना, निवडणूक आयोगावर न बोललेलं चांगलं, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.
