Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्ते यांना झटका देणारा निकाल आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने उद्याची मतमोजणी पुढे ढकलली आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले आहेत.
सगळा युक्तिवाद ऐकल्यानंतर खंडपीठाने सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे 21 डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. आज मतदान झालं तरी त्याचे निकाल 21 डिसेंबरला जाहीर करा. तसेच या निवडणुकीचे एक्झिट पोलही 20 डिसेंबरला निवडणूक संपल्यानंतर अर्धा तासाने जाहीर करता येतील. तसेच नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची आदर्श आचारसंहिताही 20 डिसेंबरपर्यंत लागू राहील, असे न्यायालयानं सांगितलं आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मोठी बातमी: नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांचा निकाल उद्या लागणार नाही; कोर्टाकडून नवी तारीख
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नेमकं काय म्हणाले?
‘नागपूर खंडपीठाने दिलेला निकाल अजून मी वाचलेला नाही. मागची 25-30 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहतोय, हे असं पहिल्यांदा घडतंय, घोषित झालेल्या निवडणुका, निकाल पुढे जात आहे. मला ही सगळी पद्धत फार योग्य वाटत नाही. खंडपीठ स्वायत्त आहे. त्यांचा निकाल मान्य करावा लागेल’, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ‘इलेक्शन कमिशन सुद्धा स्वायत्त आहे. जे उमेदवार मेहनत करतात, प्रचार करतात त्यांचा भ्रमनिरास होतो. व्यवस्थेच्या फेल्युरमुळे काही चुकीचं नसताना अशा गोष्टी होणं योग्य नाही. पुढे अजून खूप निवडणुका निवडणूक आयोगाला घ्यायच्या आहेत. पुढच्या निवडणूक प्रक्रियेसाठी आयोगाने सुधार केला पाहिजे. पुढच्या निवडणुकीत असं होणार नाही हे पाहिलं पाहिज’, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Nashik Mhada Lottery 2025 : महाराष्ट्रातील ‘या’ महत्त्वाच्या जिल्ह्यात म्हाडाची बंपर लॉटरी, फक्त आणि फक्त १४ लाखांत मिळणार स्वप्नातलं घर
देवेंद्र फडणवीस काल काय म्हणाले होते?
राज्यातील 22 नगरपरिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी काल देखील यावर प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की, ‘निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. कुठला कायदा निवडणूक आयोग काढतोय. ते मला माहित नाही, माझ्या अभ्यासानुसार निवडणुका पुढे ढकलता येत नाही’, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. या ठिकाणी निवडणूक पुढे ढकलणं अत्यंत चुकीचं आहे. उद्या निवडणुका आणि आज निवडणुका पुढे ढकलतात हे खूप चुकीचं आहे. अनेक उमेदावारांची प्रचाराची मेहनत वाया गेली. निवडणूक आयोग स्वायत्त असलं तरीही अशाप्रकारे निर्णय घेणं चुकीचंच आहे. याबद्दल रिप्रेझंटेशन आम्ही निवडणुक आयोगाला देऊ’, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
