Buldhana Couple Accident : राज्यात गुन्हेगारीसह अपघातांचं प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. अशातच बुलढाणा जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकरण समोर आलं. घरातून निघालेलं दाम्पत्याचा 45 तासानंतर शोध लागला. त्यांचा मृतदेह एका विहिरीत आढळला.
जुनी कार ठरली जीवघेणी…
पद्मसिंह पाटील यांनी अलीकडेच नवीन कार घेतली होती. जुनी कार जळगावला नेण्यासाठी तेलंगणा ते खान्देशमधील जळगाव जिल्ह्यापर्यंत असा 800 किलोमीटरचा प्रवास त्यांनी स्वतःच करण्याचा निर्णय घेतला. एरवी ते विमानाने प्रवास करत असत. मात्र, यावेळी कारने जाण्याचं ठरवलं पण नियतीने घात केला आणि हा प्रवास त्यांच्यासाठी जीवघेणा ठरला.
Nashik Crime : ‘दादा लेकींवर लक्ष ठेवशील’; मानलेल्या भावाकडून संतापजनक कृत्य, मामाकडून दोन्ही भाचींवर अत्याचार; नाशिक हादरलं
नेमकं काय घडलं?
जळगाव जिल्ह्यातील पारोळामधील वाघुळखेडा येथील पद्मसिंह दामू पाटील हे तेलंगणा राज्यातील सुरत जिल्ह्यात सिमेंट कंपनीत गेल्या पाच वर्षापासून नोकरीला होते. पत्नी आणि मुलीसह ते तेथेच राहत होते. त्यांच्या परिवारात विवाह सोहळा असल्याने पद्मसिंह पाटील हे पत्नीसह आपल्या कारने गुरुवार दि. 27 नोव्हेंबर रोजी सकाळी सहाच्या सुमारास तेलंगणातील त्यांच्या गावावरून पाचोरासाठी निघाले होते.
‘आम्ही रात्री 10 वाजेपर्यंत जळगाव येथे पोहोचू’
सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांच्या चुलत भावासोबत संवाद झाला असता ‘आम्ही रात्री 10 वाजेपर्यंत जळगाव येथे पोहोचू’, असं त्यांनी सांगितलं होतं. रात्री उशिरापर्यंत ते न आल्यानं कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या व पत्नीच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. दोघांची फोन लागले नाहीत.
Solapur News : अनगरमध्ये मोठा ट्विस्ट, राजन पाटलांच्या सुनेची बिनविरोध निवड स्थगित, उज्ज्वला थिटेंना दिलासा मिळणार?
कारचा असा होता प्रवास…
या दाम्पत्याने आपल्या कारने पातूर मेडशी टोलनाका 5 वाजून 40 मिनिटांनी क्रॉस केला होता.त्यानंतर बाळापूर जवळील तरोडा येथील टोल नाक्यापासून 6 वाजून 31 मिनिटांनी कार पुढे गेली. वडनेर भोलजीजवळ 7 वाजून 14 मिनिटांनी त्यांच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन दाखवलं होतं, त्यानंतर मोबाईल बंद झाला. दाम्पत्याचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा सरळ अपघात नसून हत्या असल्याचा आरोप नातेवाईक संदीप रमेश पाटील यांनी केला आहे. महामार्ग प्राधिकरण विभागाच्या दुर्लक्षपणामुळेच ही घटना घडल्याचा दावा करत त्यांनी संबंधित यंत्रणेविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
