Jalna Accident News : जालनामधील भोकरदन तथा जालना शिवारात काल एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 2 अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.
एकाच दुचाकीने तिघांचा प्रवास
सुरज संजय राऊत (वय 17) आणि आयुष सतीश पवार (वय 15) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावं आहेत. तर अभय बारवकर (तिघेही रा.राजूर) असं गंभीर जखमीचं नाव असून, त्याला उपचारासाठी भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातग्रस्त तिघेही एकाच दुचाकीवरून प्रवास करत होते. हे तिघे भोकरदनवरून राजूरकडे दुचाकी MH 28 AU 6618 वरून येत असताना समोरील वाहनाला दुचाकीस्वार ओव्हरटेक करत होता. मात्र, त्याचक्षणी जालन्याकडून भोकरदनकडे जाणाऱ्या ट्रक MH 21 AX 6299 आणइ दुचाकीची समोरासमोर जोराची धडक झाली. यात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक गंभीर जखमी झाला आहे.
मावशीsss हे काय झालं; बहिणीचा मुलगा भेटायला अन् विवाहित महिला घरात…; 45 वर्षीय नीलिमासोबत काय घडलं?
तपासून मृत घोषित केलं
दरम्यान, परिसरातील शेतकऱ्यांनी तात्काळ पोलिसांना फोन करून याची माहिती दिली. हसनाबाद ठाण्याचे राठोड यांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला केदारखेडा आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेमार्फत भोकरदन ग्रामीण रुग्णालयात हलविले. तर अपघातील इतर दोघांना राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. या अपघातील ट्रकचा मालक फिरोज खान (रा. जालना) तर चालक विलास अर्दाड (रा. बीड) असून अपघातील दुचाकी ही नितीन खेत्रे (रा. देऊळगाव, ता. मेहकर) यांच्या मालकीची असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Beed Crime : जमिनीचा जुना वाद, दोघांमध्ये कडाक्याचं भांडण, सख्ख्या भावाने भावालाच संपवलं; आईनेच पोटच्या मुलाची तक्रार दाखल केली
या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद घेण्यात आली आहे. तर या अपघातामुळे या शाळकरी मुलांचा जीव गेल्यानं परिवारात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर संबंधित आरटीओ विभागाने मुख्य मार्गांवर तपासणी मोहीम राबवून अल्पवयीन वाहन चालकांना प्रतिबंधित करावं, अशी मागणी सध्या जोर धरत आहे.
