• Mon. Mar 9th, 2026

    Nashik Crime : नाशिकमध्ये एकाच घरात चार जणांच्या बॉडी, व्हॉट्सॲप स्टेटसला सगळ्यांचे फोटो ठेवत लिहिले दोन शब्द… धक्कादायक घटना समोर

    Nashik Crime : नाशिकमध्ये  एकाच घरात चार जणांच्या बॉडी, व्हॉट्सॲप स्टेटसला  सगळ्यांचे फोटो ठेवत लिहिले दोन शब्द… धक्कादायक घटना समोर

    Nashik Crime News : नाशिकमध्ये देवळा तालुक्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच घरातील चौघांचे मृतदेह आढळले आहेत. सकाळी स्टेटसला घरातील सर्वांचे फोटो ठेवले होते.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मटा वृत्तसेवा देवळा : नाशिकमधील चांडवड तालुक्यातील दिदवघवदची घटना ताजी असतानाच फुलेमाळवाडी (ता.देवळा) येथील गोविंदा बाळकृष्ण शेवाळे (वय ४०) या युवकाने पत्नी आणि दोन लहान मुलांना संपवत स्वतः ही फाशी घेतल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. रविवार (ता.३०) रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. याचा अर्थ ही घटना रात्री घडली असल्याचे स्पष्ट आहे.

    गोविंदा शेवाळे यांनी हे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी व्हॉट्स ॲपवर ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ असे स्टेट्स टाकले होते. हे स्टेट्स शेवाळे यांच्या लहान भावाने पाहिले आणि त्याला काहीतरी अनुचित घडल्याची शंका आली. त्याने तात्काळ इतर नातेवाईकांना फोनद्वारे याची माहिती दिली. त्यानंतर शेवाळे कुटुंबीयांच्या निवासस्थानी गेल्यावर भयानक घटना उघडकीस आली. घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाल्याने पोलिसांनी जमावाला नियंत्रित केले. हत्या की आत्महत्या याबाबतच्या कारणांचा शोध घेण्यासाठी फॉरेन्सिक टीम तपासणी करणार आहे.
    Maharashtra Timesबापाने सहा वर्षांच्या लेकीला दारू पाजली आणि… नराधमाच्या धक्कादायक कृत्याने नाशिकमध्ये खळबळ
    स्वतःच्या मृत्यूचे संकेत देणारा ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ हा स्टेटस पाहिल्यानंतर, ही घटना पूर्वनियोजित असावी अशी शक्यता व्यक्त होत आहे. या दुर्दैवी घटनेत कोमल गोविंद शेवाळे (वय ३५), ख़ुशी गोविंद शेवाळे (वय ८), श्याम गोविंद शेवाळे (दीड वर्षे) यांचा बळी गेल्याने त्यांचेमृतदेह स्वतःच्या घरात आढळून आल्याची घटना आज सकाळी घडली आहे. यात युवक गोविंद शेवाळे याने स्वतः दोरीने फाशी घेऊन आत्महत्या केली असल्याचे दिसून येत आहे, तर पत्नी, एक मुलगी, एक मुलगा यांचा मृतदेह झोपलेल्या अवस्थेत असल्याचे प्रथम दर्शनी आढळून आले आहे. मात्र गोविंदाच्या सासरच्या लोकांनी तेथे येऊन मयत गोविंदाच्या भाऊ आणि आईस शिवीगाळ करून मारण्याचा प्रयत्न केला.
    Maharashtra TimesRaj Thackeray: नाशिकमध्ये सरकार झाडं तोडणार, राज ठाकरे भडकले; वेगळीच शंका व्यक्त करत म्हणाले…
    पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेऊन देवळा पोलिसात हजर केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत देवळा ग्रामीण रुग्णालयात श व विच्छेदनासाठी देण्यात आले असून पुढील तपास देवळा पोलीस पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्यासह पोलीस घटनास्थळी उपस्थित असून अधिक तपासासाठी नाशिक विभागीय फॉरेन्सिक टीम उपस्थित होत आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. 2020 पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. राजकीय, स्पोर्ट्स, आणि क्राईम या विषयांच्या बातम्यांमध्ये विशेष आवड. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात पत्रकारितेमध्ये आपली पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर थोडक्यात, झी २४ तास, टीव्ही९ मराठी या माध्यमांमध्येही ऑनलाईन टीममध्ये काम केले आहे.… आणखी वाचा