Sangli Crime : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच सांगलीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन महिलांच्या त्रासाला कंटाळून एका व्यक्तीनं स्वत:चं आयुष्य संपवलं आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
दोन कुटुंबातील हाणामारीनंतर विरोधी गटातील महिलांकडून होत असणाऱ्या त्रासाला कंटाळून रमेश अनुगडे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये. सांगलीच्या पलूस मधील अनुगडेवाडी मध्ये हा प्रकार घडलाय. अनुगडेवाडीमध्ये वास्तव्यास असणाऱ्या दोन कुटुंबामध्ये गेल्या आठवड्यात जोरदार वादावादीचा प्रकार घडला होता. यावेळी लोखंडी रॉड, काठ्या, तलवार आणि खुरपे यासारख्या हत्यारांनी झालेल्या मारामारीत नऊ जण गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर दोन्ही कुटुंबाकडून परस्पर विरोधी फिर्याद देण्यात आली होती. या मारामारीमध्ये आत्महत्या केलेले रमेश अनुगडे यांची पत्नी व मुलावर गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे ते सध्या कारागृहात आहेत.
HSRP नंबरप्लेटला पाचव्यांदा मुदतवाढ, 65 टक्के वाहनं बाकी, काय आहे नवीन तारीख?
या घटनेनंतर रमेश अनुगडे हे नैराश्यत होते. यानंतरही रमेश अनुगडे यांना वाद झालेल्या विरोधी कुटुंबातील दोन महिलांकडून वारंवार मानसिक व शारीरिक त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून त्यांनी राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे मात्र खळबळ उडाली आहे. त्यांच्या आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या विरोधी कुटुंबातील दोन महिलांनाही पलूस पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, रमेश अनुगडे यांच्या अंत्यविधीसाठी त्यांची पत्नी व मुलाला कारागृहातून पोलीस बंदोबस्तात आणण्यात आलं होतं. अंत्यविधी पार पडल्यानंतर दोघांची पुन्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
सुरेश धस यांच्याकडून माझ्याही जीवाला धोका, कारण…; असीम सरोदेंचा गंभीर आरोप
दूध डेअरीकडे जाताना शेतकऱ्यावर काळाचा घाला
डेअरीत दूध घालण्यासाठी पायी जाताना दुचाकीने उडवल्यामुळे वृद्धाला जीव गमवावा लागल्याची घटना कोल्हापुरात घडली आहे. गुरुवार रात्री सायंकाळी सातच्या सुमारास भीमराव रघुनाथ चौगुले (वय 65, रा. माले) चालत जात असताना पाठीमागून आलेल्या मोटारसायकलने जोरदार धडक दिल्याने त्यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. या प्रकरणी त्यांचा मुलगा संतोष चौगुले यांनी कोडोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, मोटारसायकल चालक गौतम दगडू हिरवे (रा. माले) याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
