Maharashtra Local Body Elections Campaigning : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. या निवडणुकींचा प्रचाराचा कार्यक्रम कधी थांबणार आहे? याची माहिती जाणून घ्या…
आदल्या दिवशी रात्री 10 वाजता सांगता…
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी जाहीर प्रचारबंदीच्या कालावधीतबाबत सुधारित आदेश जारी केले आहेत. या सुधारणेनुसार, मतदान सुरु होण्यापूर्वी प्रचाराची समाप्ती कधी होईल? याबद्दलची पूर्वीची तरतूद बदलण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या 4 नोव्हेंबर 2025च्या एकत्रित आदेशातील आचारसंहितेबाबत तरतूद सुधारित करण्यात आली आहे. त्यानुसार आता मतदान सुरु होण्याच्या दिवशीच्या अगोदरच्या दिवशी रात्री 10 वाचता प्रचाराची सांगता होणार आहे. म्हणजे, 2 डिसेंबर 2025ला मतदान पार पडत असल्याने आदल्या दिवशी म्हणजे, 1 डिसेंबर 2025ला रात्री 10 वाजता प्रचारकार्यक्रम थांबणार आहेत.
Maharashtra Local Body Election : मोठी बातमी! निवडणुका होणारच, स्थगिती नाही; महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर SCचा मोठा निर्णय
1 डिसेंबर 2025च्या रात्री 10 वाजल्यापासून सभा, मोर्चे, भोंग्यांचा वापर, उद्घाटन समारंभ, निवडणूक प्रचाराच्या संबंधित कोणतीही जाहिरात किंवा प्रसिद्धी होईल, अशा गोष्टींवर पूर्णपणे निर्बंध लावण्यात येतील. यापूर्वी 4 नोव्हेंबर 2025च्या आदेशात मतदान सुरु होण्यापूर्वी 24 तास अगोदर प्रचार बंद होईल, अशी तरतूद होती. दरम्यान, अधिनियमातील तरतुदीशी साम्यत्व राखण्यासाठी आता हा बदल करण्यात आला असल्याचं सांगण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाचे आयुक्तांच्या आदेशानुसार सचिव सुरेश काकाणी यांनी हे सुधारित आदेश काल गुरुवारी जारी केले आहेत.
निवडणुका होणारच, स्थगिती नाही
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याच्या आक्षेपावर आज शुक्रवारी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण तीन न्यायाधीशांकडे सुनावणीसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पुढील सुनावणी 21 जानेवारीला ठेवण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांना स्थगिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
Ratnagiri News : भास्कर राव, आपला उमेदवार असताना कुणाला पाठिंबा देताय? थेट ‘मातोश्री’वरुन समज, कोकणात धूमशान
नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या निवडणुका घोषणेप्रमाणे होणार
288 नगरपरिषदा,नगरपंचायतींच्या निवडणुका घोषणेप्रमाणे होणार आहे. 50 टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या निवडणुका आदेशाधीन राहणार, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. राज्यातील 40 नगरपरिषदा आणि 17 नगरपंचायतींमध्ये 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याची कबुली राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दिली होती. त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित सुनावणी पार पडली.
