Pune News : पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. फोन आला की तुमच्याकडून मनी लाँड्रिंगचा व्यवहार झाला आहे. मी सीबीआयमधून बोलत आहे, त्यानंतर काय घडलं? जाणून घ्या.
सायबर चोरट्यांनी रितेश राव आणि शिवा सर अशी नावे सांगून महिलेशी संपर्क साधला. त्यांनी स्वतःला सीबीआय अधिकारी असल्याचे सांगितले. महिलेच्या मोबाइल नंबर आणि बँक खात्यांवरून मनी लाँड्रिंगचे व्यवहार झाल्याची माहिती देऊन त्यांनी महिलेला घाबरवले. या प्रकरणी तपासात मदत करावी लागेल, असे बजावत त्यांनी महिलेला विश्वासात घेतले.
Pune News : खाकी वर्दीत देवदूत धावला! हृदयविकाराचा झटका आलेल्या नागरिकाचा पोलीस शिपायानं जीव वाचवला; सुशांत रणवरेंची अख्ख्या पुण्यात चर्चा
तपासात मदत करण्याच्या बहाण्याने आणि केस क्लिअर करण्यासाठी महिलेकडील पैसे तात्पुरते त्यांच्याकडे जमा करावे लागतील, असे सांगून आरोपींनी महिलेला विविध बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. यावर विश्वास ठेवून महिलेने २७ लाख ५० हजार रुपये पाठवले. तपास पूर्ण झाल्यावर पैसे परत मिळतील, असे आश्वासनही त्यांनी दिले होते. मात्र, पैसे परत न मिळाल्याने महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली.
Pune Crime : फॉर्च्युनरमध्ये बिझनेसमनचा काटा काढला, सूत्रधार निघाला पुण्याचा माजी नगरसेवक, ताम्हिणी घाटात ट्विस्ट
दरम्यान, या घटनेमुळे सायबर गुन्हेगारीचे वाढते प्रमाण आणि नागरिकांची होणारी फसवणूक पुन्हा एकदा समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, आरोपींचा शोध घेतला जात आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या फोन कॉल्स आणि मेसेजेसपासून सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवून पैसे पाठवू नयेत, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
