• Fri. Sep 18th, 2026

संपादकाचार्य बाबूराव विष्णूराव पराडकर यांच्या स्मारकाच्या जागेसाठी निवड करा – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Nov 25, 2025
संपादकाचार्य बाबूराव विष्णूराव पराडकर यांच्या स्मारकाच्या जागेसाठी निवड करा – महासंवाद




मुंबई, दि. २५ : हिंदी पत्रकारितेचे पितामह संपादकाचार्य बाबूराव विष्णूराव पराडकर यांचे मौजे पराड (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथे स्मारक उभारण्यात येणार आहे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीने पुढील सात-आठ दिवसांत जागा निवडीचा निर्णय घ्यावा, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिले.

याबाबत मंत्री ॲड. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभिषण चवरे, पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण तर दूरदृश्यप्रणालीद्वारे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह सामान्य प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभागाचे अधिकारी आणि काशी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष राममोहन पाठक उपस्थित होते.

मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, पराडकर हे निर्भिड, समाजाभिमुख पत्रकारितेचे प्रेरणास्थान असून आजही हिंदी पत्रकारितेच्या इतिहासात त्यांचे नाव सर्वोच्च मानले जाते. काशी येथे त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. पराडकर हे कोकणातले सुपुत्र असल्याने त्यांचे स्मारक तसेच त्यांचे जीवनदर्शन लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. यादृष्टीन त्यांच्या मूळगावी स्मारक उभारण्यात येत आहे. स्मारक उभारणीसाठी शासनाने सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. या नियुक्त समितीने स्मारकासाठी जागा निश्चिती व मोजणी करून त्या ठिकाणी स्मारकाबरोबरच गावकऱ्यांच्या अनुषंगीक मागणीचा विचार करावा. याकामी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी सात-आठ दिवसात निर्णय घेऊन तत्काळ अहवाल पाठवावा, असे निर्देश मंत्री ॲड. शेलार यांनी दिले.

०००

संजय ओरके/विसंअ







Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed