Anant Garje Wife Dr Gauri Palve ends life : जिच्या सोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं, त्या महिलेला सुद्धा गुन्ह्यात आरोपी करणे गरजेचे महत्वाचे आहे, असं मत रुपाली पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
रुपाली पाटील यांची सोशल मीडिया पोस्ट
“अशा घटना अत्यंत दुर्दैवीच असतात. डॉ गौरी यांच्या वडिलांचा आक्रोश पाहिला. श्रीमंताला पोरी देऊ नका असे म्हणत ओक्साबोक्शी रडत होते, एक बाप हतबल होता. पण घरातील माणसाने आत्महत्या केल्यावर हे कळण्यापेक्षा, आधीच घरातील लोकांनी संवाद, समन्वय असणे फार फार महत्त्वाचे आहे. मुळामध्ये मुलींना सक्षम बनून त्यांची मानसिक स्थिती ही माहेरचे किंवा सासरचे दोघांकडे एक समंजसपणाचे वागणे हे फार महत्त्वाचे आहे.” असे रुपाली पाटील ठोंबरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे.”डॉक्टर जरी असली तरी त्या सिच्युएशनला या नवरा बायकोच्या भांडणांमध्ये नवऱ्याचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर यावरुन झालेले वाद हे फार महत्त्वाचे आहेत.नवऱ्यावर, सासूवर तसेच नणंद यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. त्याचप्रमाणे जिच्या सोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं, त्या महिलेला सुद्धा गुन्ह्यात आरोपी करणे गरजेचे महत्वाचे आहे.” असं मत रुपाली पाटलांनी व्यक्त केलं आहे.
Pune Crime : लग्नाच्या आमिषाने पुण्यात 13 वर्षांच्या मुलीला पळवून नेलं, 25 वर्षीय तरुणाला अटक, सावत्र आई म्हणाली, तुम्ही दोघं…
“एक घर एक महिला उभे करू शकते तसेच ती महिला जर एखाद्याचे घर संपवण्याचे कारण बनू शकते, अशा बेकायदेशीर संबंध कृत्य करणाऱ्या, अनैतिक संबंध ठेवणाऱ्या महिलांवर सुद्धा गुन्हा दाखल केलाच पाहिजे. त्याशिवाय कुटुंब वाचणार नाहीत, कुटुंब सुरक्षित राहणार नाहीत. आणि अनैतिक संबंध करण्याचे धाडस करणार नाही. यामुळे कुटुंब वाचतील.” असं परखड मत रुपाली पाटलांनी मांडलं आहे.
Smriti Mandhana Palash Muchhal Wedding : पलाश म्हणाला, आता मला तोपर्यंत फेरे घ्यायचे नाहीत, जोपर्यंत… स्मृतीच्या सासूबाईंनी सगळं सांगितलं, हळद लागल्याने नवरदेवाला…
“पत्नी तिच्या नवऱ्याचे अनैतिक संबंध आहेत म्हणून आत्महत्या करते तेव्हा नवऱ्यावर त्याच्या घरातील लोकांवर गुन्हा दाखल होतो पण खरी जी गुन्हेगार आहे अनैतिक संबंध ठेवणारी महिला मोकाट राहता कामा नये. बाकी यावर सविस्तर बोललेच.” असं सांगतानाच “महत्वाचे अजून एक जाता जाता कितीही संकटं, भांडणं झाली तरी आत्महत्या पर्याय नाही. त्यामुळे आत्महत्या कोणीही करूच नये” हेही रुपाली पाटील यांनी अधोरेखित केलं आहे.
