Ayodhya Ram Temple: राममंदिर सजले, पंतप्रधान फडकवणार भगवा ध्वज
आज अयोध्या नगरी पाना-फुलांनी अन् सुंदर रोषणाईने सजली आहे. सकाळपासूनच इथे उत्साहाचे वातावरणही पाहायला मिळत आहे. याला कारण म्हणजे, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी राममंदिराच्या शिखरावर भगवा ध्वज फडकवणार आहेत. हा ध्वज 10 फूट उंच आणि 20 फूट लांबीचा त्रिकोणी ध्वज आहे. त्यावर सूर्य, कोविदार वृक्ष आणि ओम यांच्या प्रतिमा असतील. तर, दुपारी 12 वाजता हा भगवा ध्वज फडकवला जाईल.
