• Sat. Mar 7th, 2026

    धक्कादायक! पंकजा मुंडेंच्या PA च्या पत्नीने जीवन संपवलं, अवघ्या 10 महिन्यांत डॉक्टर गौरी यांचा टोकाचा निर्णय, कारण…

    धक्कादायक! पंकजा मुंडेंच्या PA च्या पत्नीने जीवन संपवलं, अवघ्या 10 महिन्यांत डॉक्टर गौरी यांचा टोकाचा निर्णय, कारण…

    Mumbai News: मुंबईतील वरळीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. काही महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या गौरी यांनी जीवन संपवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

    धक्कादायक! पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीने जीवन संपवलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: मुंबई शहरातील वरळीतून धक्कादायक घटना घडली असून भाजप नेत्या आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यकाच्या पत्नीने आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं आहे. पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांनी वरळीतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. काही महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या गौरी यांनी शनिवारी सायंकाळी 7 वाजता हे टोकाचं पाऊल उचललं आहे.

    कौटुंबिक वादातून ही आत्महत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तसंच सासरच्या मंडळींकडून छळ होत असल्याने तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप गौरी पालवे यांच्या माहेरच्या कुटुंबियांनी केला आहे. या घटनेनंतर पंकजा मुंडे यांनी बीडमधील आपले सर्व कार्यक्रम रद्द केले असल्याचे समजते. याप्रकरणी वरळी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवला आहे.

    नेमकं कारण काय?

    अनंत गर्जे आणि डॉक्टर गौरी पालवे यांचा विवाह 7 फेब्रुवारी रोजी मोठ्या थाटामाटात झाला होता. या लग्नाला पंकजा मुंडे आणि माजी खासदार प्रीतम मुंडे देखील उपस्थित होत्या. लग्नाला अवघे 10 महिने पूर्ण होण्याआधीच गौरी यांनी आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अनंत गर्जे यांचे विवाहबाह्य संबंध असल्याने गौरी अस्वस्थ होत्या, अशी माहितीही समोर येत आहे. याच नैराश्यातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचा दावा केला जात आहे.

    गौरी पालवे या मुंबईतील केईएम रुग्णालयात कार्यरत होत्या. शनिवारी रात्री त्यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर पंकजा मुंडे यांनी आपले बीडमधील सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत.

    दरम्यान, घटनेबाबतची माहिती मिळताच वरळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर या घटनेचे सत्य बाहेर येईल, असं सांगितले जात आहे. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसंच पोलिसांनी कुटुंबियांची चौकशी सुरू केली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा