Pune News : राजकीय पटलावर कोणीच कधी कोणाचा कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो हे वाक्य पुन्हा एकदा सिद्ध झालं
चाकण नगरपरिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी दोन्ही शिवसेना एकत्र आल्याचे पाहायला मिळालं. महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी ही घटना येणाऱ्या काळात राज्याचं राजकारण बदलणारी ठरणार का याची चर्चा आता सुरु झाली आहे. चाकण मधील शिंदे आणि ठाकरे गटाच्या या युतीमुळे राजकीय पंडितांच्या भुवाया उंचावल्या आहेत. चाकण नगराध्यक्ष पदासाठी शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा सुरेश गोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदे गट आणि ठाकरे गट यांची युती पाहायला मिळाली. मनीषा गोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना खेडचे ठाकरे गटाचे आमदार बाबाजी काळे शिरूरचे शिंदे गटाचे आमदार शरद सोनवणे हे दोन्हीही नेते सोबत होते.
Tejasvee Ghosalkar : आरक्षण सोडतीत धक्का; ठाकरेसेनेच्या तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या, हा निर्णय दुःखद, यापुढे मी…
या युतीवर खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे खेड-आळंदीचे दिवंगत आमदार सुरेश गोरे यांच्या निधनानंतर ही पहिली निवडणूक होत आहे. त्यांच्या पत्नी मनीषा गोरे नगराध्यक्षपदासाठी उभ्या आहेत. अशा प्रसंगी राजकारण बाजूला ठेवून, दिवंगत आमदारांना आदरांजली म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे. पण ही युती नाही. असं बाबाजी काळे म्हणाले आहेत.
Arun Gujarathi : पवार साहेबांनी खूप दिलं, आता वय झालं, राजकारण सोडतो; बड्या नेत्याने शब्द फिरवला, दुसऱ्याच्याच पक्षप्रवेश सोहळ्यात पटकन ‘घड्याळ’ बांधलं
तर, उद्धव ठाकरे आणि संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे हा निर्णय फक्त चाकण नगराध्यक्ष पदापुरता मर्यादित आहे. तालुक्यातील राजगुरुनगर आणि आळंदी येथे आम्ही स्वबळावर लढत असल्याचं बाबाजी काळे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे चाकण मधील ठाकरे गट आणि शिंदे गटाची युती ही सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे.

