Ratnagiri Man Ends Life: रत्नागिरीत एका तरुणाने आपल्या आयुष्याची अखेर केली. हा तरुण मुंबईहून रत्नागिरीला आपल्या गावी गेला होता. रोज जेवायला येणारा भाऊ आज आला नाही म्हणून मोठा भाऊ त्याला बघायला गेला आणि त्यांना हे दृश्य दिसलं.
खेड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुधीर लक्ष्मण पार्टे हे कुटुंबासहित मुंबई येथे एक खाजगी नोकरी करत होते. मात्र, ते आठवडाभरापूर्वी त्यांच्या खेड तालुक्यातील बोरगाव या गावी आले होते. गावी आल्यानंतर त्यांनी घराच्या आजूबाजूला स्वच्छता केली, बेणणी केली. याच दरम्यान ते शेजारी असलेल्या भावाकडे भोजनासाठी चार दिवस जात होते. मात्र, नेहमी येणारा भाऊ आज दुपारी जेवायला का नाही आला हे पाहायला त्यांचे मोठे बंधू दिलीप हे सुधीर यांच्या घरी गेले. त्या वेळेला त्यांना भाऊ गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. हे दृश्य पाहून भावाला मोठा धक्का बसला. यावेळी हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला.
Solapur News: मरायच्या आधी सर्वांच्या मनातून उतरुन… इन्स्टावर पोस्ट केली अन् मग तरुणाने जीव दिला, आई-वडिलांचा टाहो
खेड तालुक्यातील बोरघर – ब्राह्मणवाडी येथील सुधीर लक्ष्मण पार्ट (वय-45) यांनी अडीच लाखाचे कर्ज फेडता न आल्याने नैराश्यातून 14 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या मुदतीत गळफास घेऊन आपला जीव दिला.
मयत सुधीर लक्ष्मण पार्टे यांनी सुमारे वर्षभरापूर्वी कर्ज घेतले होते. सुमारे अडीच लाख रुपये फेडता न आल्याने याच नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सुधीर यांनी स्वतःच्या राहत्या जुन्या घरातील हॉलच्या माळ्यास असलेल्या लाकडी भालाला ओढणीने बांधून त्या ओढणीचा फास गळ्यात अडकवून गळफास घेत जीव दिला. सुधीर यांच्या पश्चात पत्नी, एक लहान मुलगा तीन भाऊ, भावजय असा मोठा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेची नोंद खेड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.

