Nanded Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिलांच्या हत्येचा बदला पोटच्या मुलाने घेतल्यानं नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे.
2009 साली बापाची हत्या
मयत राष्ट्रपाल कपाळे हा बळीरामपूर येथील पंचशीलनगर येथील रहिवासी आहे. 2009 साली आरोपी नागेश गवळे (वय 20 रा. वाघाळा) याचे वडील राजेंद्र गवळे यांची हत्या करण्यात आला होती. यात राष्ट्रपालसह इतर तीन जण आरोपी होते. काही वर्षापूर्वी राष्ट्रपाल आणि इतर दोन साथीदारांची दोघांची निर्दोष मुक्तता झाली. जेलमधून सुटल्यानंतर तो ऑटो चालवून उदरनिर्वाह करायचा तसेच घरी किराणा दुकान देखील होतं. इकडे वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आरोपी नागेश गवळे हा षडयंत्र रचत होता.
Nandurbar Accident : सासूचा अंत्यविधी आटोपून परतताना अनर्थ, भरधाव दुचाकीची गायीला धडक; जावयाचा जागीच करुण अंत
शरीरावर सपासप वार
काल शुक्रवारी रात्री सात वाजेच्या सुमारास राष्ट्रपाल हा दुकानात असल्याची माहिती आरोपीला मिळाली, त्यानंतर आरोपी नागेश याने आपल्या इतर दोन साथीदारांसोबत त्याला घेरून तीक्ष्ण हत्याराने शरीरावर वार केले आणि फरार झाले. रक्तबंबाळ झालेल्या राष्ट्रपालचा घटनास्थळी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
Amravati Crime : सू करायला थांब, मग मी येतो आणि… विवाहिता मिस्त्रीच्या नादाला लागली, नवऱ्याला जंगलात नेलं अन्… महाराष्ट्रातील घटना
सुरुवातीला आरोपीबाबत माहिती मिळणे पोलिसांसमोर आव्हान बनलं होतं. मात्र, पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी तपासाची चक्र फिरवत तीन तासांच्या आत प्रकरण उघडकीस आणलं. शिवाय नागेश राजेंद्र गवळे (वय 20, रा. शाहूनगर वाघाळा), अभिजीत राणू गजभारे (वय 20, रा. धनेगाव) आणि लकी राजकुमार पारखे (वय 19, रा. गौतमनगर, किल्ला रोड) या आरोपींना अटक केली. वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

