Kharghar Accident: सायन पनवेल महामार्गावर काल रात्री एक भीषण अपघात झाला. खारघर येथे एका स्विफ्ट गाडीला मागून येणाऱ्या क्रेटाने जोरदार धडक दिली. या धडकेमुळे स्विफ्ट गाडी ब्रिजचे रेलिंग तोडून थेट खाडीत कोसळली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही वाहने एकाच दिशेने जात असताना क्रेटा गाडीने अचानक स्विफ्टला मागून कट मारत धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की स्विफ्ट कार 25 फूट खोल खाडीत पूर्णपणे बुडाली होती. घटनेनंतर आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने पोलिस आणि अग्निशमन दलाला कळवले.
Pune Navale Bridge : नवले पुलाजवळ अपघात थांबवायचे कसे? मुरलीधर मोहोळांची तातडीची बैठक, अवजड गाड्यांबाबत सर्वात मोठा निर्णय
गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा
अग्निशमन पथक आणि पोलिसांनी संयुक्तरीत्या कार बाहेर काढण्याचे काम सुरू केले. गाडी वर खेचताना नागरिकांनी संपूर्ण घटनेचा व्हिडिओ शूट केला, जो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये कारचा अक्षरशः चेंदामेंदा झालेला स्पष्ट दिसतो. गाडीत अडकलेला चालक बाहेर काढण्यात आला, पण तोपर्यंत त्याला मृत घोषित करण्यात आले होते. मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पनवेल उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
पुण्यात महायुतीत धुसफूस, भाजपची साथ शिवसेना सोडणार? रविंद्र धंगेकरांनी सांगितली स्ट्रॅटर्जी
क्रेटा चालक फरार
या अपघातानंतर परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सफेद रंगाच्या स्फिट गाडीचा चेंदामेंदा झालेली द़श्य एक्स वरती व्हायरल होत आहेत. गाडीचा चिराडा झालेले पाहून अपघाताची तिव्रता लक्षात येते. पनवेल पोलिस आता मृत व्यक्तीची ओळख पटवून पुढील तपास करीत आहेत. क्रेटा गाडीच्या धडकेमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलीस चालकाचा शोध करत आहेत. प्रत्यक्षदर्शनींनी दिलेल्या माहितीनुसार क्रेटा गाडी स्फिटला कट मारून गेली. दोन्ही वाहने सायन पनवेल महामार्गावर एकाच दिशेने जात होते. दोन्ही वाहने वेगात असल्यामुळे एका कटमुळे स्फिट गाडी सरळ रेलिंग तोडून थेट बाजूला असलेल्या खाडीत कोसळली.

