Mumbai CSMT Red Colour Bag Found : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ एक लाल कलरचे बेवारस बॅग आढळून आली आहे. या बॅगेची तपासणी केली असता त्यात काही आढळलेलं नाहीय.
बॅगेत काय काय आढळलं?
मुंबईतील सीएसएमटी (CSMT) जवळ एक लाल कलरची बॅग आढळली आहे. याची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचले. विशेष बाब म्हणजे, ही बॉम्ब शोधक पथकाने ही बॅग उघडली असता, त्यात काही कपडे, टॉवेल, वह्या, पुस्तकं आणि काही कागदपत्रे आढळली आहेत. संपूर्ण बॅगेची तपासणी केली असता त्यात स्फोटक पदार्थ किंवा हानिकारक वस्तू आढळल्या नाहीत, त्यामुळे सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय.
नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात भर वस्तीत बिबट्याचं थैमान, दोन-तीन जणांवर हल्ला, रेस्क्यू टीम दाखल
मुंबईकरांसाठी मोठी बातमी
मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे प्रवाशांना पुन्हा एकदा गैरसोयीचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे गर्दीच्या वेळी आंदोलन केल्यामुळे सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या (CRMS) दोन पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर CRMS ने ‘नियमानुसार काम’ करण्याचा इशारा दिला असून त्यामुळे लोकल सेवा पुन्हा ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Pune News: पुण्यात वारंवार होणाऱ्या अपघांतामुळे नागरिक त्रस्त, सामाजिक कार्यकर्त्यांचा संताप, महामार्गावर प्रशासनाविरोधात तिरडी आंदोलन
मुंब्रा दुर्घटनेत दोन रेल्वे अधिकाऱ्यांवर दाखल झालेला गुन्हा रद्द करावा, अशी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाची मागणी आहे. त्यांच्या मते, व्हीजेटीआय (VJTI) चा अहवाल सदोष असून तो वास्तवाशी जुळत नाही. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात बाह्य संस्था रेल्वे कर्मचाऱ्यांवर खोटे आरोप लावून त्यांना त्रास देत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्ची होत आहे आणि त्यांना रेल्वे प्रशासन किंवा बाहेरील संस्था कोणाचे ऐकावे, असा प्रश्न पडला असल्याचा दावा CRMS ने केला आहे.

