woman dies in latur: लातूरमध्ये कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल झालेल्या ३८ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नातेवाईकांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी शवविच्छेदन अहवालानंतर कारवाई करण्याचे म्हटले आहे.
लातूरमधल्या छत्रपती शाहू महाराज चौकात एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे. उपलब्ध माहितीनुसार बुन्हाणनगर भागातील एक ३८ वर्षे वयाची महिला कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी त्या रूग्णालयात दाखल झाली होती. दाखल होताच काही तासातच त्यांचा मृत्यू झाला आहे. सदर दुर्घटना रूग्णाच्या नातेवाईकांना कळताच नातेवाईक संतप्त होऊन रूग्णालयासमोर एकत्र जमा झाले.
वडिलांच्या वारशासाठी आवडतं क्षेत्र सोडलं; बिहारच्या राजकारणात ‘चिराग’ चमकला, 19 जागा जिंकल्या, कसा होता आतापर्यंतचा प्रवास?
डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी ते आक्रमक झाले. मात्र, या प्रकरणी दुपारपर्यंत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नाही. पोलिसांकडून सदरील घटने संदर्भात आम्हाला शव विच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर गुन्हा नोंद करून घेता येतो, आम्ही या प्रकरणात अधिकचा तपास करत असल्याचे पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब खोरेवाड यांनी सांगितलं आहे.
स्वतः चालत गेलेल्या महिलेचा मृतदेहच हाती मिळाला
लातूर शहरातील छत्रपती शाहू महाराज चौकातील सना हॉस्पिटल या दवाखान्यात सदरील महिला कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल झाली होती. भुलतज्ञ न बोलवल्यामुळे सदरील महिलेचा मृत्यू झाल्याची शंका नातेवाईकांकडून व्यक्त करण्यात येत आहेत. या प्रकरणी लवकरात लवकर डॉक्टरवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि डॉक्टरकीची सनद रद्द करावी, अशा स्वरूपाची मागणी आता नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकारामुळे लातूर शहरातले दवाखाने नागरिकांसाठी सुरक्षित आहेत का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

