Latur News : लातूर जिल्ह्यातील हंडरगुळी येथे शिवाजी विद्यालयातील २००१ च्या दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी माणुसकीचे दर्शन घडवले. या कृतीने स्वार्थी युगातही खरी मैत्री आणि संवेदनशीलता जिवंत असल्याचे दाखवून दिले.
येथील शिवाजी विद्यालयातील २००१ साली दहावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी, आपल्या सोबत शिकलेल्याआणि काही महिन्यांपूर्वी अल्पशा आजाराने निधन पावलेला मित्र गणेश कांबळे (वय ३९) यांच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्याच्या माध्यमातून आधार दिला. कुटुंबाचा प्रमुख गमावल्याने निर्माण झालेल्या संकटाच्या काळात वर्गमित्रांनी पुढाकार घेत, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी व कुटुंबाच्या आधारासाठी एकत्रितपणे रु. ८२,६०० इतकी रोख मदत त्यांच्या घरी जाऊन सुपूर्द केली.
Latur Crime : अश्लील व्हिडिओ पाहून तिसरीतील पोराचं वर्गमित्रासोबत अनैसर्गिक कृत्य, लातूरच्या शाळेत प्रकार, शिक्षक वर्गात आले अन्…
या प्रसंगी सर्व मित्र भावनिक झाले होते. मदत देताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. आपल्या सहाध्यायी मित्राच्या कुटुंबासाठी सर्वांनी एकत्र येऊन केलेले हे कार्य समाजात एक प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. वर्गमित्रांनी एकत्र येत केलेली ही मदत दाखवून देते की, आजच्या स्वार्थी युगातही खरी मैत्री, संवेदनशीलता आणि माणुसकी अजूनही जिवंत आहे. दिवंगत गणेश कांबळे यांच्या आठवणींना अभिवादन करत त्यांच्या वर्गमित्रांनी उभा केलेला हा ‘मैत्रीचा हात’ संपूर्ण परिसरासाठी एक प्रेरणादायी संदेश ठरला आहे.

