• Sun. Mar 8th, 2026

    दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन  – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Nov 13, 2025
    दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन  – महासंवाद




    मुंबई, दि. १३ : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सहकार महर्षी वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त विधान भवन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार व पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

    याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-1 जितेंद्र भोळे, उप सभापती यांचे खाजगी सचिव अविनाश रणखांब,  अवर सचिव (समिती) सुरेश मोगल, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

    ००००







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *