Jalgaon News : अरुण गुजराथी हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे कट्टर समर्थक समजले जात असून दोन महिन्यांपूर्वी त्यांनी राजकारण संन्यास घेण्याचे सूतोवाच केले होते
अरुण गुजराथी हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे कट्टर समर्थक समजले जातात. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी राजकारण संन्यास घेण्याचे सूतोवाच केले होते. सोबतचे काही पदाधिकारी अजित पवार गटात जात असल्याने त्यांना केवळ मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी सांगीतले होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी जळगावात आलेल्या मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अरुण गुजराथी आमच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती दिली होती.
लोकसभेच्या पाठोपाठ विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षातील अनेक माजी मंत्री आणि माजी आमदार यांच्यासह नेत्यांनी पक्षातून काढता पाय घेतला होता. या हादऱ्यातून पक्ष सावरला नसतानाच शरद पवार यांचे कट्टर समर्थक आणि निष्ठावान समजले जाणारे विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा पवित्रा घेतल्याने खळबळ उडाली होती.
Snehal Ambekar : ठाकरेसेनेच्या तिघा दिग्गजांचे प्रभाग आरक्षित, मुंबईच्या माजी महापौर म्हणाल्या, आता माझ्यासमोर तीन पर्याय
सप्टेंबर महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची जळगाव जिल्हा बैठक प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत जिल्हा कार्यालयात पार पडली होती. या बैठकीला पक्षाचे जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते उपस्थित असताना नेहमीच पक्षाच्या बैठकांना आवर्जून उपस्थिती लावणारे अरुणभाई गुजराथी या बैठकीला अनुपस्थित राहिल्याने तेव्हाच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
Indurikar Maharaj : मला घोडे लावा, पण माझ्या मुलीच्या कपड्यावर कमेंट्स? व्यथित इंदोरीकर महाराजांचा कीर्तन सोडण्याचा निर्णय, आता मी कंटाळलो…
शरद पवार साहेबांनी मला खूप दिले, मात्र माझे वय झाले आहे. त्यामुळे हळूहळू राजकारणातून बाहेर पडणार आहे. कार्यकर्ते काय तो निर्णय घेतील, असं दोन महिन्यांपूर्वी अरुण गुजराथी म्हणाले होते. अनेक वर्षांपासून सोबत असलेल्या कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करावी लागणार, पण पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाईल असा विषय नसल्याचं ते म्हणाले होते.

