अहिल्यानगरच्या खारे कार्जुन येथे शेकोटीजवळ बसलेल्या रियांका सुनील पवार (वय ५) या बालिकेला बिबट्याने उचलून नेले. बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. शोध घेऊनही तिचा तपास लागला नाही. हे गाव नगर शहरापासून जवळच आहे. पवार कुटुंब मजुरीसाठी गावात आलेले आहे. सायंकाळी थंडी वाजत असल्याने त्यांनी शेकोटी पेटविली होती. तेव्हा अचानक बिबट्याने हल्ला केला. रियंकाला उचलून घेऊन त्याने जवळच्या तुरीच्या शेतात धूम ठोकली. ग्रामस्थ आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शोध घेतला, मात्र काहीही हाती लागले नाही. शेजारच्या गावांत सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
कुटुंबातील सदस्यांनी आरडाओरड करत केला पाठलाग
ही घटना पाहून कुटुंबातील सदस्यांनी आरडाओरड करत पाठलाग केला. मात्र बिबट्याचा मागमूसही लागला नाही. काही क्षणांतच वस्तीवर लोकांची गर्दी झाली. नागरिकांनी एकत्र येऊन शोध मोहीम सुरू केली, परंतु निष्फळ ठरली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होतं. दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण गावावर भीतीचे सावट पसरले आहे.मंगळवारीच कामरंगाव येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने एका बिबट्याचा मृत्यू झाला होता, आणि त्याच्यानंतर अवघ्या २४ तासांतच पुन्हा अशी भयावह घटना घडल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत.
Pune Crime : पुणे गोळीबाराने हादरलं, फॉर्च्युनर गाडीत गप्पा मारत होते, अचानक पिस्तूल काढली अन्…; मित्रांनीच मित्राचा घात केला
बिबट्याचा वाढता वावर, प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा रोष
गेल्या काही महिन्यांपासून नगर तालुक्यात बिबट्याचे दर्शन, हल्ले आणि मृत्यूच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र वन विभागाकडून ठोस उपाययोजना न झाल्याने लोकांचा संताप वाढत चालला आहे. नागरिकांनी शासनाकडे तातडीने बिबट्यांच्या हालचालींवर नियंत्रण आणण्याची आणि ग्रामीण भागातील सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
मुली आणि महिलांवर तंत्रविधी, मानवी कवट्या आणि पुन्हा वशीकरण.. कोल्हापुरात ‘चुटकीवाला बाबा’मुळे खळबळ
आमच्या लेकरांना तरी सुरक्षित ठेवा, हादरलेल्या पालकांचा आक्रोश
या घटनेनंतर रियांकाच्या आई-वडिलांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. आमचं लेकरू आमच्याच डोळ्यांसमोर बिबट्याने उचलून नेलं, काहीच करता आलं नाही, असं म्हणत कुटुंब आक्रोश करत होतं.

