Nashik Youth Dies in Mumbai : नाशिकवरुन मुंबईत फिरण्यासाठी आलेल्या 30 वर्षीय अमर पगारे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज सकाळीच तो मुंबईत पोहोचला होता, 11 च्या सुमारास येथील मरोळ नाका परिसरात आला असता ही दुर्घटना घडली.
नाशिकवरुन मुंबईत आला अन्…
नाशिकवरुन मुंबईत फिरण्यासाठी आलेल्या 30 वर्षीय तरुण अमर आनंद पगारे याचा दुर्दैवी मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे आज सकाळीच तो मुंबईत पोहोचला होता. 11च्या सुमारास येथील मरोळ नाका परिसरात आला असता ही धक्कादायक घटना घडली. मरोळ नाका परिसरामध्ये यावेळी प्रेविलोन या विकासाकाकडून सुरू असलेल्या बांधकाम इमारतीच्या सातव्या मजल्यावरून लोखंडी रॉड डोक्यात कोसळून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी येथील कूपर रुग्णालयात पाठवला आहे. मुलगा गेला अशी माहिती मिळताच नाशिकमध्ये आई-वडिलांसह कुटुबीयांनी आक्रोश केला.
शिंदेसेनेला मोठी लॉटरी, गणितं फिरली; भाजप, ठाकरेसेनेची सारखीच व्यथा, 30 टक्के जागांवर झटका
नागरिकांमध्येही भितीचं वातावरण
मुंबईत सातत्यानं इमारतींचं बांधकाम सुरु असताना लोकांच्या मृत्यूच्या दुर्दैवी घटना घडत आहेत. कधी गुन्हेगारीनं, कधी अपघातानं किंवा कधी बॉम्बस्फोटाने असुरक्षित वाटणारी मुंबई आता उंच इमारतींच्या बांधकामानेही असुरक्षित वाटू लागली आहे. त्यामुळे, स्थानिक नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. बांधकाम इमारतीच्या सुरक्षाव्यवस्था राम भरोसे आहेत का? असा प्रश्न सर्वसामान्य मुंबईकरांकडून विचारला जात आहे. सध्या या घटनेमध्ये चूक कोणाची आहे? कशामुळे ही घटना घडली? यासंदर्भात एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

