Badlapur News : गेल्या काही दिवसांपासून विवाहबाह्य संबंध असलेली अनेक प्रकरणं आता समोर येऊ लागली आहेत. अशातच बदलापूरमधील एक असेच प्रकरण समोर आले आहे. तीन मुलांची आई असलेली विवाहित काय करून बसली, जाणून घ्या.
नेमकं काय घडलं?
बदलापूर पश्चिम भागात राहणारे ४४ वर्षीय व्यापारी, त्यांची पत्नी आणि तीन मुलांसोबत राहत होते. व्यवसायानिमित्त त्यांना अनेकदा बाहेरगावी जावे लागत असे. याच काळात, त्यांच्या पत्नीचे त्याच इमारतीत राहणाऱ्या एका विवाहित व्यक्तीसोबत प्रेमसंबंध जुळले. या प्रेमसंबंधांबद्दल पतीला माहिती मिळाल्यानंतर दोघांमध्ये वारंवार वाद होऊ लागले होते.
Thane Crime : चारित्र्याच्या संशयावरुन सतत वाद, डोक्यात तिडीक गेल्यानं बायकोला संपवलं, नंतर स्वत:ला…; ठाणे हादरलं
हत्येचा थरार शुक्रवारी मध्यरात्री, जेव्हा पती झोपेत होता, तेव्हा पत्नी आणि तिच्या प्रियकराने मिळून ही क्रूर घटना घडवली. त्यांनी दोरीने पतीचा गळा आवळून त्याची हत्या केली. त्यानंतर, त्यांनी मृतदेह एका गादीत गुंडाळला. हा मृतदेह एका मोटरसायकलवर टाकून बदलापूर येथील वालवली पुलाजवळील उल्हास नदीपात्रात फेकून दिला.
Kalyan Ring Road : डोंबिवली-कल्याण रिंगरोड लवकरच सुरू, खाडी किनाऱ्यालगत संपूर्ण मार्ग; ठाण्यापर्यंतचं अंतर कमी होणार
पोलिसांची कारवाई
घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी तातडीने कारवाई केली. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने नदीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला. या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिचा विवाहित प्रियकर या दोघांना अटक केली असल्याची माहिती वपोनि किशोर शिंदे यांनी दिली आहे. या घटनेची परिसरात चर्चा होत आहे. या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत.

