Raigad Accident News : रायगड जिल्ह्यातील खडताळ पुलावर एक भीषण अपघात काही दिवसांपूर्वी झाला होता. यात दोन तरुण गंभीर जखमी अवस्थेत होते. त्यांच्यापैकी एकाचा आज रुग्णालयात उपचारादरम्यान, मृत्यू झाला आहे.
नियंत्रण सुटल्यानं समोरासमोर धडक
या भीषण अपघातात दुसरा जखमी तरुण अभिजीत मुरली वालिया परंबीर (वय 21, रा. अलिबाग) याच्यावर अद्याप उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं रुग्णालय प्रशासनकडून सांगण्यात आलं आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, खडताळ पुलावर दोन्ही वाहनं विरुद्ध दिशेने येत असताना वेग आणि नियंत्रण सुटल्यानं समोरासमोर धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की, दोन्ही वाहनं काही अंतरावर फेकली गेली, तर दोघेही वाहनचालक रस्त्यावर गंभीर अवस्थेत पडले.
Jalna News: तीन दिवसांपासून बेपत्ता, नंतर शेतातील विहिरीत बॉडी सापडली; 21 वर्षीय विवाहितेसोबत काय घडलं?
पहाटे उपचारादरम्यान मृत्यू
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्परतेनं दोघांनाही अलिबाग ग्रामीण रुग्णालयात हलवलं. मात्र, स्थिती गंभीर असल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी पनवेल एम.जी.एम. रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. त्यापैकी सागर जोशी याने उपचारादरम्यान प्राण सोडला. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे खडताळ पूल परिसरात सिग्नल, स्पीडब्रेकर आणि चेतावणी फलक लावण्याची मागणी पुन्हा केली आहे. या ठिकाणी यापूर्वीही अनेक अपघात झाले असल्यानं नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून वाहतूक नियमांचे पालन करावं, असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
मोनोरेलमध्ये पुन्हा तांत्रिक बिघाड; वडाळा डेपोजवळ रुळावरून घसरली, MMRDAने चुकीवर पांघरूण घालताना कोणतं कारण सांगितलं?
रायगडमधील ‘या’ नदीवरील पूल मृत्यूचा सापळा की…
कर्जत तालुक्यातील एका गावाजवळ उल्हास नदीवर उभारलेला पूल आज अक्षरशः मृत्यूच्या उंबरठ्यावर उभा आहे. ४० वर्षांपूर्वी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने बांधलेला हा पूल आता धोकादायक अवस्थेत असून, त्याच्या खांबातील लोखंडी सळ्या बाहेर पडल्या आहेत, काँक्रीट कोसळले आहे आणि पाया निखळत चालला आहे. दररोज या पुलावरून शेकडो लोक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत.

