राज्यात परतीचा पाऊस गेल्यानंतरही पुन्हा मुंबईसह राज्यभरातील विविध भागात मुसळधार सरींनी हजेरी लावली. आधीच अतिवृष्टीने कोलमडलेला शेतकरी या पुन्हा आलेल्या पावसाने चिंतेत आला आहे. मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेला हा पाऊस आज मंगळवारपासून काहीसा कमी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दुसरीकडे राज्यात लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आज 4 नोव्हेंबरपासून पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
Breaking News 4th November 2025 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स
