Uddhav Thackeray: मतदारयाद्यांतील घोळावरुन शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर टीका केली.
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आयोगावर टीका केली. आमच्या शाखेत येऊन मतदारयादी तपासा. परवा मतचोरीच्या मुद्द्यावरून एकत्र सर्वपक्षीयांचा मोर्चा झाला. त्या वेळी सर्वांनी सरकारला जाब विचारला. आता आम्ही मतदारांची ओळख केंद्र हे प्रत्येक शाखा शाखांमध्ये सुरू करणार आहोत. त्यानंतर पुढच्या आठवड्याभरात आक्षेप आणि काही सूचना या स्वीकारल्या जातील. आता जर कोणी झोपले तर तो संपला. याच्या मागे कोण काय याची खातरजमा कोणी तरी करायला हवी.
मतचोरीचा मुद्द्यावर भाजपचं शिक्कामोर्तब, पण आता त्यातही हिंदू-मुस्लीम करतायंत : ठाकरे
आम्ही आमच्या शाखांमध्ये मतदारांची केंद्रे उघडतो आहोत. या केंद्रात मी नागरिकांनी यावे, त्यांनी त्यांची नाव आहेत की नाही, हे आमच्या शाखेत येऊन तपासावे. जर तुम्हाला यात काही गोंधळ वाटला तर लगेचच सांगा,’ असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी या वेळी केले.
मुंबईत चार नवे कबुतरखाने; सकाळी ‘या’ वेळेतच दाणे टाकण्यास BMCची परवानगी, कुठली जागा ठरली?
शेलार यांनी फडणवीस यांना पप्पू ठरवले
एका-एका घरात ४० ते ५० नावेही नोंदली गेली आहेत. तर मी मतदारांना आवाहन करतो की आपल्याला न दिसणारी, आपल्या परवानगीशिवाय न राहणारी, आपल्या परवानगीने राहणारी माणसे आहेत का, ही निवडणूक आयोगाची उभी केलेली भुते आपल्या घरात राहत तर नाही ना, याची चौकशी केंद्रात करावी. सर्व जात, धर्माच्या मतदारांनी तिथे येऊन मतदारयादीची चौकशी करावी. तुमचे नाव वगळले का, वय किती आहे, लिंग बदलले का, धर्म बदलला का, हे सर्व येऊन तपासावे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

