• Thu. Jun 11th, 2026
    आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, छगन भुजबळ यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया

    Chhagan Bhujbal Heart Surgery : काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांच्या छाती दुखू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर आता मोठी बातमी समोर येत आहे. छगन भुजबळ यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अनुराग कांबळे, मुंबई : आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील फायरब्रँड नेते छगन भुजबळ यांच्याबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भुजबळ गेल्या काही दिवसांपासून आजारपणाचा सामना करत होते. यानंतर त्यांच्यावर आता हृदय शस्त्रक्रिया पार पडल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. छगन भुजबळ यांची गेल्या आठवड्यात प्रकृती खालावली होती. गेल्या आठवड्यात मंगळवारी मंत्रालयात मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीला छगन भुजबळ यांनी हजेरी लावली होती. तसेच मंत्रालयात पार पडलेल्या सर्व बैठकांमध्ये छगन भुजबळ उपस्थित होते.

    छगन भुजबळ यांनी मंत्रालयातील बैठकांमध्ये काही महत्त्वाच्या सूचना देखील दिल्या होत्या. पण मंत्रालयाचं कामकाज आटोपल्यानंतर छगन भुजबळ यांना थकवा जाणवू लागला होता. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. छगन भुजबळ यांना जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर त्यांच्या कार्यालयाकडून छगन भुजबळ यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती देण्यात आली होती. पण त्यानंतर आज भुजबळ यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याची माहिती समोर येत आहे.

    विख्यात हृदयरोग तज्ज्ञाच्या हस्ते शस्त्रक्रिया

    राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्यावर आज एशियन हार्ट इन्स्टिट्यूट मुंबई येथे हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. विख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रमाकांत पांडा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया पार पडली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या शस्त्रक्रिये नंतर डॉक्टरांनी पुढील काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला छगन भुजबळ यांना दिला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होण्यासाठी त्यांना पुढील काही दिवस कोणालाही भेटता येणार नाही, अशा सूचना डॉक्टरांनी दिल्या आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून ते लवकरच पूर्णपणे बरे होऊन आपल्या कार्यात पुन्हा सक्रिय होणार आहेत, अशी माहिती भुजबळ यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.

    छगन भुजबळ यांची काही दिवसांपूर्वी अँजिओग्राफी करण्यात आली. त्या तपासणीअंती डॉक्टरांनी बायपास शस्रक्रिया करावी लागेल, असा सल्ला दिला होता. त्यानुसार सोमवारी ही शस्रक्रिया करण्यात आली आहे. पुढील किमान 15 दिवस भुजबळ आराम करणार असल्याचे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले आहे.
    Maharashtra Timesबीडमध्ये पुन्हा मुंडे विरुद्ध मुंडे लढत? महायुतीला तडा जाणार? पडद्यामागच्या घडामोडींनी सस्पेन्स वाढवला
    छगन भुजबळ हे गेल्या काही दिवसांमध्ये ओबीसी मेळाव्यांमध्ये सहभागी झालेले बघायला मिळाले होते. त्यांचा मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेटच्या नोंदनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध आहे. त्यामुळे त्यांनी ओबीसी मेळाव्यांमध्ये त्या विरोधात रोखठोक भूमिका मांडली. त्यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर जोरदार टीका केली होती. तसेच ते मराठा आरक्षणाच्या नव्या कायद्या विरोधात कोर्टातही जाणार असल्याचं बोलत होते. या सर्व घडामोडींदरम्यान त्यांची प्रकृती बिघडली होती. आता त्यांची तब्येत बरी असल्याची माहिती आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा