राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू आता एक येताना दिसत आहेत. मनसे आणि महाविकास आघाडीने काढलेल्या मोर्चातही दोन्ही बांधवांची एकजूट बघायला मिळाली. दोन्ही नेत्यांचे हावभावही खूप बोलके होते. त्यामुळे आगामी काळात दोन्ही भाऊ एकत्र राजकारण करतात का? ते येणारा काळ ठरवेल. पण दोन्ही भाऊ ज्या कारणामुळे आणि लढ्यामुळे मनाने एकत्र आले त्या लढ्याला आगामी काळात यश येण्याची शक्यता आहे. कारण डॉ. नरेंद्र जाधव यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.
विशेष म्हणजे राज्य सरकारच्या या भूमिकेमुळे गेल्या दोन दशकांपासून ज्या दोन भावांमध्ये दुरावा होता ते भाऊ एकत्र आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या निर्णयाला प्रचंड विरोध केला. तसेच दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन मुंबईच मोठा मोर्चा काढण्याचा इशारा दिला. यामुळे राज्य सरकारवरील दबाव वाढला होता. अखेर वाढता दबाव पाहता राज्य सरकारला एक पाऊल मागे यावं लागलं. राज्य सरकारने संबंधित निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करणं टाळलं.
राज्य सरकारने त्रिभाषा धोरण राज्यात अवलंबलं जावं का? याचं संशोधन करण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. ही समिती अभ्यास आणि संशोधन करुन राज्य सरकारला अहवाल देणार आहे. त्या अहवालाच्या आधारे याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिल्यानंतर ठाकरे बांधवांचा मोर्चादेखील स्थगित झाला. त्यानंतर दोन्ही बांधवांचा एकत्रितपणे विजय मेळावा पार पडला.
उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात उद्या नवा बॉम्ब टाकणार? महत्त्वाची माहिती समोर
आपण दिलेल्या लढ्याला काहीसं यश आलं यासाठी दोन्ही पक्षाकडून विजय मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात दोन्ही ठाकरे बंधू एकाच मंचावर 20 वर्षांनंतर पहिल्यांदा एकत्र आलेले बघायला मिळाले. ठाकरे बंधूंनी पुकारलेल्या या लढ्याला आता पूर्ण यश येतं की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. कारण डॉ. नरेंद्र जाधव यांनी याबाबत सूचक वक्तव्य केलं आहे.
डॉ. नरेंद्र जाधव नेमकं काय म्हणाले आहेत?
“त्रिभाषा धोरणाला राज्यातून विरोधच आहे. त्यामुळे शासनाच्या धोरणानुसार पहिलीपासून हिंदी विषयाची गरज नाही. हिंदीसक्ती पहिलीपासून करण्यापेक्षा पाचवीपासून करावी”, असं त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव यांनी म्हटलं आहे. रत्नागिरी येथील पत्रकार परिषदेत त्यांनी संबंधित वक्तव्य केलं. “शालेय विद्यार्थ्यांना तीनही भाषा सक्तीच्या केल्या तर एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था होईल”, असं स्पष्ट मत नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केलं आहे. विविध प्रसारमाध्यमांनी याबाबत वृत्त दिलं आहे.
सोने, चांदी, पैसे, काहीच सोडलं नाही, जालन्यात चक्क पोलिसाच्याच घरी चोरी, शहरात खळबळ
“बहुसंख्य लोकांनी असं मत व्यक्त केलं की, हिंदी भाषा ही पाचवी पासून असायला हरकत नाही. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगू इच्छितो की, काही लोकांनी आग्रह धरला की हिंदी पहिलीपासून असली पाहिजे. काही लोकांनी असंही मत मांडलं की, हिंदीचं मराठीवर अतिक्रमण होत आहे ते रोखलं पाहिजे. त्यावर काही लोकांनी असंही मत मांडलं की हिंदी महाराष्ट्रातून लोप पावत चालली आहे. आता या सगळ्यांच्या मतांचा आदर राखून आम्ही स्वीकारली आहेत” असंही नरेंद्र जाधव म्हणाले आहेत.

