Sikandar Shaikh News : महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी शस्त्र तस्करी प्रकरणी अटक केली आहे. मोहाली येथे ही कारवाई झाली. पपला गुर्जर टोळीशी संबंध असल्याचा संशय आहे. सिकंदरचे वडील रशीद शेख यांनी मुलाला फसवल्याचा आरोप केला आहे.
शस्त्र तस्करी प्रकरणात सिकंदर शेखचा सहभाग असल्याची माहिती पंजाब पोलिसांनी दिली आहे. कोल्हापूरच्या गंगावेश तालीम घडलेल्या सिकंदर शेखला अटक करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणावर सिकंदरचे वडील, पैलवान रशीद शेख यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. माझ्या घराची झडती घेतली असता, माझ्या घरात एक चाकू सुद्धा सापडणार नाहीय. मग शस्त्र तस्करी प्रकरणात माझ्या मुलाच कसं काय नाव आलं? त्याचं कोडं पडलं आहे. माझ्या घरावर अजून स्लॅब देखील नाही,पत्र्याच्या घरात राहतो, अशी गरिबी परिस्थिती जीवन जगत आहोत. माझ्या मुलाला फसवलं आहे, असं रशीद शेख यांनी सांगितले.
Sikandar Shaikh News : महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पपला गँगशी संबंध, गाडीमध्ये त्यावेळी… जाणून घ्या
प्रामाणिक राहिल , बेमानगिरी कदापि करणार नाही-
रशीद शेख यांनी पुढे बोलताना सांगितले, माझ्या मुलाने अत्यंत कष्टाने नाव कमावले आहे, कोणी तरी फसवून त्याला या प्रकरणात गुतवलं आहे. मी आयुष्यभर हमाली करून कमावलं, मीच हरामचा पैसा कमावला नाही तर माझा मुलगा हरामची कमाई कसा कमवेल?, असं रशीद शेख यांनी म्हणाले.
Sikandar Shaikh : ‘महाराष्ट्र केसरी’ विजेता पैलवान सिकंदर शेखला अटक, कुस्ती क्षेत्रात खळबळ, प्रकरण काय?
पुणे येथे २०२३ मध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेतल्याने चर्चेत आलेले पैलवान सिकंदर शेख यांनी २०२४ मध्ये महाराष्ट्र केसरी किताब जिंकला. आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू म्हणून त्यांना क्रीडा कोट्यातून लष्करात नोकरी मिळाली होती, पण त्यांनी ती सोडली. गेल्या पाच-सहा महिन्यांपासून ते पंजाबमध्ये वास्तव्यास होते. पंजाबमधील कुस्तीच्या वातावरणाचा फायदा घेत त्यांनी आपल्या खेळाला अधिक धार आणली.

