Jalgaon Accident News : राज्यात अपघातांचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, जळगावमधील अडावदमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका 21 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.
अडावद येथील पोलीस स्टेशन समोरील वडगाव रस्त्यावर आज गुरुवारी रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास एक ट्रक चंदसनी, कमळगाव, वडगाव येथील शेतातून टरबूज भरून अडावदकडे येत होता. ट्रक क्रमांक आर.जे. 40 जी.ऐ. 4196 वरील चालकानं आपल्या ताब्यातील वाहन रस्त्याची परिस्थिती न पाहता चालविल्यानं समोरून येणाऱ्या दुचाकीला क्रमांक एम. एच. 19 एन. 5979 जोरदार धडक दिली. दुचाकीवरील तरुण आकाश ज्ञानेश्वर पाटील हा खाली पडताच तो ट्रकच्या चाकाखाली आला आणि त्याचा जागीच करुण अंत झाला.
Phaltan Doctor Death Case : फोटो, व्हिडिओ अन् स्क्रीनशॉट सापडले, प्रशांत बनकरचा लॅपटॉप जप्त; गोपाल बदनेबाबत पोलीस कोर्टात म्हणाले…
अपघातानंतर ट्रकचालक वाहन सोडून पसार झाला आहे. मयत आकाश हा गरीब कुटुंबातील होतकरू तरुण होता. आपल्या वडिलांना तो गॅरेजमध्ये मदत करत असे. गॅरेजवरून दुपारच्या जेवणासाठी घरी येत असताना हा अपघात झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, काका आणि काकू असा मोठा परिवार आहे.
Powai Hostage Case : 17 मुलांसह ज्येष्ठांना केलं किडनॅप, पोलिसांना फोन अन् ऑपरेशन सुरु; रोहित आर्यच्या तावडीतून मुलांना कसं सोडवलं?
‘हॅलो…भाऊ मला हे लोक मारताय’
जळगावमधील अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील प्रफुल प्रकाश भदाणे (वय 35) याचा मृतदेह संशयितरित्या चंद्रपूर जिल्ह्यात आढळून आल्यानं त्याची हत्या झाल्याचं समोर आलं आहे. प्रफुल भदाणे हा 22 ऑक्टोबर रोजी एका वाहनावर चालक म्हणून गेलेला होता. 24 ऑक्टोबर रोजी प्रफुल चंद्रपूरच्या हद्दीत खंबाळा येथे जेवायला थांबला होता. काही वेळानंतर प्रफुलने त्याचा भाऊ प्रदीप प्रकाश भदाणे याला फोन आला की, ‘काही लोकं मला मारत आहेत आणि मी पळत आहे’. प्रदीपने आपल्या भावाला म्हणजे प्रफुलला त्या मारणाऱ्या व्यक्तींजवळ फोन द्यायला सांगितला. प्रदीपने त्यांना विनंती केली की, ‘मी पैसे पाठवून देईन तुम्ही प्रफुलला दवाखान्यात दाखल करा’. त्यांनी हो म्हटलं आणि फोन बंद पडला. तिकडच्या पोलिसांनी काही फोटो पाठवले असता मयत इसम प्रफुल असल्याचं निष्पन्न झालं. प्रफुलच्या अंगावर मारहाणीच्या जखमा आढळून आल्या आहेत.

