Rohit aarya encounter: मुंबईत शाळकरी मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचे पोलिसांनी एन्काऊंटर केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले ते पाहूयात.
दरम्यान, या प्रकरणानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांनी या प्रकणावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोण काय म्हणाले आहे, ते पाहूयात.
Raigad News: शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, बड्या नेत्याला एका जुन्या प्रकरणात न्यायालयाकडून सात वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा
मुंबईत झालेल्या या प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले की, लवकरच या प्रकरणाबद्दलची सविस्तर माहिती सांगितली जाईल. गृहविभागाचीही जबाबदारी मुख्यमंत्रीच पाहत असल्याने आता ते नेमकं या सर्व प्रकरणावर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
तसेच याप्रकरणावर बोलताना उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले की, मुलांना ओलीस ठेवणं हे चुकीचं आहे. त्यांनी सांगितलं की, “आम्ही जेव्हा या प्रकरणाची चौकशी केली तेव्हा आम्हाला समजले की आरोपींनी काही सरकारी बिल वसूल करण्यासाठी हे कृत्य केले. त्यांनी काय कारवाई केली याचे उत्तर पोलिस देतील, परंतु पैसे मिळवण्यासाठी लहान मुलांना ओलीस ठेवणे चुकीचे आहे. पोलिसांनी त्या भावनेतून कारवाई केली असावी”, असं सामंत म्हणाले आहेत.
तर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी रोहित आर्य यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली आणि मुंबई शहरातील बिघडत्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला.
त्याचवेळी सरकारच्या आर्थिक बेशिस्तपणाचा फटका लहानग्या मुलांना बसला असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. “राज्य सरकारने बिल थकवल्याने रोहित आर्या नावाच्या माणसाने पवई येथील स्टुडिओमध्ये तब्बल १७ मुलांना ओलिस धरले होते. इथे पोलिसांना केमिकल आणि एअरगन देखील मिळाली आहे. आज खूप मोठी दुर्घटना पोलिसांमुळे टळली आहे.”, असं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.
हॉटेल भाग्यश्रीमध्ये पुन्हा राडा, हॉटेल कामगारांनीच तरूणाला चोपलं?, मालकाने सगळं सांगितलं!
शिक्षण विभागाचे प्रोजेक्ट करूनही त्याचे २ कोटी थकवले हा आरोप रोहित आर्याने केले होता, त्यावरुन “सरकारने अशी किती बिल थकवली आहेत? यातून अजून किती मोठ्या घटना घडू शकतात? सरकारच्या बेशिस्त आर्थिक नियोजनामुळे आज निष्पाप मुलांचा जीव गेला असता तर जबाबदारी कुणाची आहे? तत्कालीन शिक्षणमंत्री केसरकर जबाबदारी घेणार की महायुती सरकार ?असे प्रश्न वडेट्टीवरांनी उपस्थित केले आहेत.

