Satara Doctor Crime News: फलटण डॉक्टर तरुणी आत्महत्याप्रकरणी आरोपी गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर कारवाई सुरु आहे. दोघांनाही न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. गोपाळच्या कस्टडीमध्ये आता वाढ करण्यात आली आहे.
फलटणमधील जिल्हा उपरुग्णालयातील महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली होती. तिने मृत्यूपूर्वी आपल्या तळहातावर सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या नोटमध्ये तिने पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर या दोघांवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. गोपाळने आपल्यावर चारवेळा अत्याचार केल्याचं तिने लिहिलं होतं, तर प्रशांतने गेल्या काही दिवसांपासून मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप महिला डॉक्टरने नोटमध्ये लिहिला होता.
Ahilyanagar News: बसमधील सिटवरुन एकमेकींना भिडल्या, पोलिस ठाण्यात गेल्यावरही तुंबळ हाणामारी, पोलिसांनी घेतलं ताब्यात…
यानंतर पीएसआय गोपाळ बदनेला तात्काळ निलंबित करण्यात आलं होतं तर प्रशांत बनकरला अटक करण्यात आली होती. त्यानंतर गोपाळ बदने पोलिसांना शरण आला होता. त्याला न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यास पाच दिवसांची पोलिस कोठडी सुन्यावण्यात आली होती. त्यात आज पुन्हा एकदा न्यायालयाने दोन दिवसांची वाढ केली आहे. त्यामुळे बदनेला आता 30 ऑक्टोबरपर्यंत कोठडी आहे.
दरम्यान, आरोपींवर कठोरात कठोर कारवाईची मागणी जनसामान्यातून होत आहे. पण न्यायालयात या प्रकरणी वकिलांकडून युक्तीवादाची लढाईही सुरु आहे. या प्रकरणात सरकारी वकील क्षमा बांदल या युक्तीवाद करत आहेत. तर आरोपी प्रशांत बनकरच्या वतीने सुनील भोंगळ युक्तीवाद करत आहेत. गोपाळने महिला डॉक्टरला आत्महत्येला प्रवृत्त केलं, तिचा चार महिने मानसीक आणि शारिरीक छळ केला. यासंबंधीचे कॉल्स, कागदपत्रं सर्व पोलिसांना मिळालेले आहेत पण, त्यांची सखोल चौकशी करण्यासाठी छळ कसा आणि कुठे केला हा तपास करण्यासाठी तसेच दोन्ही आरोपींचा एकमेकांशी संबंध आहे का हे तपासण्यासाठी पाच दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती. सदर मागणीला न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर पोलिसांच्या बाजूने निर्णय देत गोपाळची कस्टडी वाढवली आहे.
हॉटेल भाग्यश्रीमध्ये पुन्हा राडा, हॉटेल कामगारांनीच तरूणाला चोपलं?, मालकाने सगळं सांगितलं!
याप्रकरणाचा तपास करुन आरोपींना शिक्षा देण्याचं आव्हान पोलिस आणि तपास यंत्रणांपुढं आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी हे प्रकरण तरुणीने हातावर लिहून ठेवल्यामुळे स्पष्ट आहे आहे, आरोपींना कठोर कारवाईला सामोरं जावं लागणार, असं स्पष्ट केलं आहे.

