• Sun. Mar 8th, 2026

    संरक्षण व एरोस्पेस उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची नवीन ओळख – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Oct 23, 2025
    संरक्षण व एरोस्पेस उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची नवीन ओळख – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    नागपूर, दि. २३ : मिहान आर्थिक क्षेत्रात सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस ही भारतातील अग्रगण्य उत्पादक कंपनी  २३३ एकर क्षेत्रात  अत्याधुनिक संरक्षण व एरोस्पेस उत्पादनात  प्रकल्प  उभारणार आहे. या प्रकल्पासाठी मिहान तर्फे २३३ एकर भूखंडाचे वाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

    रामगिरी येथे आयोजित  कार्यक्रमात  मिहान विशेष आर्थिक क्षेत्रातील  आजपर्यंतच्या सर्वात मोठया भुखंडाचे वितरण मुख्यमंत्री यांच्या हस्ते कंपनीचे अध्यक्ष श्री. सत्यनारायण नुवाल यांना करण्यात आले.

    या प्रसंगी संरक्षण उत्पादन कंपनीचे मनीष  नुवाल, राघव नुवाल, जे.एफ साळवे तसेच महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे  व्यवस्थपकीय संपादक तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर श्री. गौरव उपश्याम, संजय इंगळे आधी उपस्थित होते.

    सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस कंपनी  राज्यात १२ हजार ८० कोटीची गुंतणूक करुन अत्याधुनिक संरक्षण व एरोस्पेस उत्पादन  प्रकल्प  उभारणार आहे.  या प्रकल्पामुळे  ६ हजार ८०० प्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होणार आहे. तसेच मिहान आर्थिक क्षेत्रात ६८० कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक करुन विमान व संरक्षण उपकरण निर्मिती केंद्र स्थापन करणार आहे. या प्रकल्पामुळे ८७५ प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. हा उपक्रम महारास्ट्राच्या ‘मेक इन इंडिया’ ‘आत्मनिर्भर भारत’ आणि औद्योगिक प्रगतीच्या विकासाठी अधिक बळकटी देणारा ठरणार असल्याची  ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

    मिहान सेझ प्रकल्पातील सर्वात मोठे भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस कंपनीला वितरीत करण्यात येत असून महाराष्ट्राच्या प्रगत, गुंतवणूकदार-अनुकूल धोरणांचा व अग्रगण्य उद्योगांचा वाढता विश्वास यावरून अधोरेखीत होत असल्याचे  यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगीतले.

    या प्रकरणामुळे संरक्षण उत्पादन उद्योग क्षेत्रात नागपूरला आंतरराष्ट्रीय स्तरावरील  मान्यता मिळणार असून यामुळे विदर्भाच्या औद्योगिक प्रगतीत मोठी भर पडणार आहे.

    शासन व महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे फलित आहे. उच्च-मूल्य गुंतवणूक आकर्षित करणे, प्रादेशिक रोजगारनिर्मिती वाढवणे आणि संरक्षण व उत्पादन क्षेत्रात राज्याचे नेतृत्व अधिक दृढ करणे हा त्यामागील हेतू  असल्याचे यावेळी एमएडीसीचे सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. विपीन ईटनकर यांनी सांगितले.

    ०००००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed