Yavatmal Accident News : राज्यात अपघातांचं प्रमाण वाढत चाललं आहे. असाच एक भीषण अपघात झालाय. या अपघातात एका दाम्पत्यासह एकाचा जागीच मृत्यू झालाय. या घटनेनं शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
बोरगाव मंजू येथील धीरज शाळीग्राम सिरसाठ (वय 35) आणि त्यांची पत्नी अश्विनी (वय 30) हे दोघेही दुकानाचे सामान घेऊन ‘छोटा हत्ती’ने मंगळवारी रात्री कारंजा तालुक्यातील खेर्डा येथे जात होते. पैलपाडा गावाजवळ त्यांच्या वाहनात बिघाड झाल्याने गावाकडे परत जाण्यासाठी त्यांनी दुसरे वाहन बोलविले. आरिफ खान अहमद खान (वय 28) व अन्वर खान अब्दुल खान (वय 25) हे दोघेही तातडीने वाहन घेऊन पैलपाडा गावाजवळ पोहोचले. यानंतर चौघेही नादुरुस्त वाहनाची पाहणी करीत रस्त्याच्या कडेला उभे असताना मूर्तिजापूरकडून बोरगाव मंजूकडे जाणाऱ्या एका मालवाहू वाहनाने त्यांना धडक दिली.
आईचा आक्रोश, बिबट्याची माघार; शेपटी पकडली अन् लेकरासाठी ‘ती’ बिबट्याशी भिडली! नेमकं काय घडलं?
या भीषण अपघातात धीरज, अश्विनी व आरिफ खान यांचा जागीच मृत्यू तर अन्वर खान हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. जखमीला शासकीय रुग्णालयात दाखल केले. अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून महामार्गावरील सीसीटीव्हींच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू आहे.
दिवाळीच्या दिवसांत तीन शेतकऱ्यांनी संपवलं जीवन
देशभरात दिवाळीचा आनंद ओसंडून वाहत असतानाच यवतमाळ जिल्ह्यात दोन दिवसांत तीन शेतकरी आत्महत्या झाल्याचे सोमवारी समोर आले. कळंब, बाभूळगाव आणि दारव्हा तालुक्यातील या घटनांमुळे शेतकरी आत्महत्यांचे दुष्टचक्र अजूनही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Vasai Fort Video : शिवरायांच्या पोशाखात आलेल्या तरुणाला हटकलं, हिंदी सुरक्षा रक्षकाचं कृत्य, ‘हिंदीतून बोला’ म्हणत माज, युवकाने काय केलं?
कळंब तालुक्यातील तिरझडा येथील अल्पभूधारक शेतकरी सुभाष वसंत ठुसे (३५) यांनी १८ ऑक्टोबरला सायंकाळी गावातीलच ग्रामपंचायतीच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये त्यांच्या शेतातील सोयाबीन व कपाशीचे नुकसान झाले. त्यांच्यावर बँकांचे कर्ज वाढत असल्याने ते सतत काळजीत राहत होते. यातच त्यांनी आत्महत्या केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

